आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

CONFIRMED! सैफ अली खानने केले उघड, डिसेंबरमध्ये करीना देणार बाळाला जन्म

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूरच्या प्रेग्नेंसीची बातमी कन्फर्म केली आहे. एका प्रसिद्ध एन्टरटेन्मेंट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सैफ म्हणाला, "माझी पत्नी आणि मला सांगू इच्छितो, की डिसेंबर महिन्यात आमचे पहिले बाळ जन्माला येणार आहे. आम्ही सर्व शुभचिंतकांच्या आशीर्वाद आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद देतो."
करीनाच्या प्रेग्नेंसीची चर्चा गेल्या महिन्याभरापासून मीडियात सुरु आहे. असे म्हटले गेले होते, की करीना साडे तीन महिन्यांची गर्भवती आहे. मात्र करीना किंवा तिच्या कुटुंबीयांनी याची घोषणा केली नव्हती. याविषयी जेव्हा करीनाचे वडील रणधीर कपूर यांच्याशी बातचित झाली तेव्हा ते म्हणाले होते, "मला याविषयी कुणीही काहीही सांगितलेले नाही. माझ्याकडे याविषयीची माहिती नाही. मात्र आशा करतो, की बातमी खरी ठरावी."

2012 मध्ये झाले होते सैफ-करीनाचे लग्न
- सैफ अली खानने 16 ऑक्टोबर 2012 रोजी त्याच्यापेक्षा वयाने दहा वर्षे लहान असलेल्या करीनासोबत दुसरे लग्न केले होते. त्याचे पहिले लग्न अभिनेत्री अमृता सिंहसोबत झाले होते.
- 21 सप्टेंबर 1980 रोजी मुंबईत जन्मलेल्या करीनाचे अफेअर बराच काळ शाहिद कपूरसोबत होते. मात्र शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिने सैफसोबत लग्नगाठ बांधली.
- सैफ-करीनाच्या जोडीला सैफीना या नावाने ओळखले जाते. दोघांची लव्ह स्टोरी 2008 मध्ये टशन या सिनेमाच्या सेटवर सुरु झाली होती.
- दोघांनी कधीही आपले नाते लपवून ठेवल नव्हते.
- सैफला पहिली पत्नी अमृतापासून मुलगी सारा आणि मुलगा इब्राहिम आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सैफ-करीनाची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...