आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'फोटोंच्या फ्लॅशने तैमूरवर होतोय परिणाम', पापारझींना करीनाने सुनावले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - बी टाऊनमधील सेलिब्रिटी किड्स मीडियासाठी नेहमीच आकर्षणाचे केंद्र असतात. त्यात बेबो करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा तैमूर तर गेल्या काही दिवसांत अधिकच चर्चेत आहे. तैमूर अगदी घराच्या बाहेर जरी पडला तरी लगेचच कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकायला लागतात. कोणत्याही कार्यक्रमात तो दिसला की, त्याचे फोटो काढण्यासाठी एकच गर्दी झालेली पाहायला मिळते. सैफ आणि करीना मुलाला मीडियापासून फार दूर ठेवत नसले तरी करीना आता या पापारझींना कंटाळली आहे. करिनाने नुकतीच याविषयी नाराजी व्यक्त केली आहे. 
 
करिना म्हणाली की, सैफ आणि मी मुलाला मीडियापासून दूर ठेवायचे नाही असे ठरवले होते. त्यामुळेच आम्ही त्याला कार्यक्रमांमध्ये आणि इतर अनेक ठिकाणी घेऊन जातो. त्याचे फोटोही बिनधास्तपणे काढू देतो. पण सध्याला त्याच्यावर जरा जास्तच कॅमेरे रोखलेले असतात. त्यामुळे अनेकदा कॅमेऱ्यांच्या एकामागून एक पडणाऱ्या शेकडो फ्लॅशमुळे तैमूर गोंधळूनही जातो, असे करीना म्हणाली आहे. अनेकदा आम्ही सोबत नसलो तरी कॅमेऱ्यांचे फ्लॅश सारखे तैमूरवर चमकत असतात. त्यामुळे त्याच्यावर परिणाम होत असल्याने करीनाने पापारझींबाबत नाराजी व्यक्त केली आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत करीनाने तिची ही मते मांडली. 

आम्हालाही मीडियापासून फार दूर राहायचे नसते. पण एका मर्यादेनंतर सर्व काही नकोसे होते. अतिरेक झाला की, या गोष्टी नको वाटायला लागतात असे करीना म्हणाली. सध्या करीनाचे जिम बाहेरचे अनेक फोटो मीडियामध्ये येत आहेत. त्याबाबत बोलताना करिनाने हे मत व्यक्त केले. 

शूटला तैमूरलाही बरोबर नेणार!
करीना लवकरच वीरे दी वेड्डींग चे शुटिंग सुरू करणार आहे. मला तैमूरपासून लांब राहायला आवडत नाही. पण शुटिंगसाठी जावेच लागणार आहे. त्यामुळे कधी कधी त्याला सोबत नेता येईल का याचा प्रयत्न करणार असल्याचेही करीनाने सांगितले. शुटिंग आणि तैमूर यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करणार असल्याचे करीना म्हणाली. 

मातृत्वावर पुस्तक लिहिणार 
करीनाने ती लवकरच मातृत्त्वावर एक पुस्तक लिहिणार असल्याचेही सांगितले आहे. हे पुस्तक लिहणे मजेशीर असेल असे करीना म्हणाली आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, तैमूरचे काही PHOTOS
बातम्या आणखी आहेत...