आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या तारखेला होणार करीनाच्या बाळाचा जन्म! रणधीर कपूर यांचा खुलासा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर खान ही लवकरच आई होणार आहे. पुढच्या काही दिवसांतच करीना तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. मात्र तिच्या ड्यू डेटविषयीची माहिती समोर आलेली नाही. आता करीनाचे वडील रणधीर कपूर यांनी याविषयीचा खुलासा केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, आम्ही सर्वच जण करीनाच्या बाळाला पाहण्यासाठी उत्सुक आहोत. तिचे आरोग्य उत्तम असून बाळाचीही वाढ चांगली होत आहे. डॉक्टरांनी तिला 20 डिसेंबर ही तारीख दिली आहे. डिलेव्हरी नॉर्मल होणार की सिजेरियन...

हा प्रश्न जेव्हा रणधीर कपूर यांना विचारला गेला, तेव्हा ते म्हणाले, ''करीना हेल्दी असून तिच्या बाळाची वाढ चांगली होत आहे. मात्र तिची डिलेव्हरी नैसर्गिकरित्या होणार की नाही हे अद्याप सांगता येण्यासारखे नाही. करीनाचे स्वास्थ्य आणि बाळाची स्थिती पाहूनच तारीख जवळ येताच डॉक्टर याबाबत निर्णय घेतील. सध्या, आम्ही फक्त आमच्या नातवंडाच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आहोत.''

बाळाच्या जन्मानंतर काम सुरुच ठेवणार करीना...
आपण गरोदर असल्याचे करीनाने जाहीर केले, त्याचवेळी मुल झाल्यानंतरही तिचे आयुष्य पूर्वीसारखेच राहिल आणि ती चित्रपटसृष्टीतही कार्यरत राहणार असल्याचे तिने सांगितले होते. त्यानंतर रॅम्पवॉक करण्यापासून ते जाहिरात करण्यापर्यंत सैफची ही बेगम नेहमीच चर्चेत राहिली.

डिलेव्हरीपूर्वी करीनाने बेबी बंपसोबत बरेच फोटोशूट केले आहेत, त्याची एक झलक तुम्ही पुढील स्लाईड्समध्ये बघू शकता....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...