आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor\'s Sizzling Hot Mera Naam Mary Song Video From Brothers!

आयटम नंबरमध्ये करीनाने दाखवल्या बोल्ड अदा, पाहा तिचा Sizzling Look

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या कामूक कायाने लोकांच्या हृदयाची धडधड वाढवणारी अभिनेत्री करीना कपूर 'ब्रदर्स'च्या आयटम साँगमध्ये दिसली आहे. करीना या गाण्यात सिझलिंग दिसून येत आहे. या आयटन साँगचे बोल 'मेरा नाम मॅरी' असून करीनाच्या ठुमक्यांनी सर्वांना वेड लावले आहे. या गाण्याचा फस्ट लूक समोर आल्यापासून चाहत्यांना याची मोठी प्रतिक्षा होती. सिनेमा निर्माता करण जोहरने हे गाणे टि्वट केले आहे. गाण्यात करीना टू-पीस गोल्डन ड्रेसमध्ये दिसली आहे. करीनासोबत गाण्यामध्ये सिध्दार्थ मल्होत्राची झलकसुध्दा दिसली.
बेबोच्या गाण्याने सुरुवातीपासूनच चर्चा एकवटली आहे. हे गाणे #MeraNaamMary नावाने सोशल साइट्सवर ट्रेंड करत आहे. 'मेरी नाम मेरी'ची तेवढीच अशीच चर्चा रंगली आहे, जेवढी कतरिना स्टाट 'चिकनी चमेली'ची होती. दोन्ही गाण्यामागे एकच टीम आहे. कतरिनाचे गाणे 'अग्निपथ'मधील होते, त्याचा निर्माता करण जोहर आणि दिग्दर्शक करण मल्होत्रा होता. हेच निर्माता-दिग्दर्शक 'ब्रदर्स' सिनेमाशी जोडलेले आहेत. त्या गाण्याप्रमाणेच या गाण्यालासुध्दा अजय-अतुलनेच कंपोज केले आहे. गणेश आचार्यने कोरिओग्राफी केली आहे. अमिताभ भट्टाचार्यने गाणे लिहिले आहे.
दिग्दर्शक करणने सांगितले, की शूटिंग खूपच आव्हानात्मक होते. याला मढ आयलँडमध्ये चित्रीत करण्यात आले आहे. तिथे गर्दी असल्याची खूप अडचणी येतात. करीना स्टारर या गाण्याची शूटिंग सात दिवसांत पूर्ण करण्यात आली. गाण्यात अनेक शॉट्सचे 10 ते 12वेळा रिटेक घेण्यात आले. मात्र करीनाने यावर आक्षेप घेतला नाही. हे गाणेसुध्दा एका गंभीर क्षणावेळी येते, जसे 'अग्निपथ'मध्ये 'चिकनी चमेली' आले होते.
सिनेमात अक्षय कुमार, सिध्दार्थ मल्होत्रा आणि जॅकलीन फर्नांडिस यांच्या मुख्य भूमिका आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गाण्यातील करीनाचा हॉट अंदाज...