आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिश्माला मिळाला घटस्फोट, वाचा कोट्यधीश नव-याकडून पोटगीत काय-काय मिळाले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांच्या घटस्फोटाला न्यायालयाने मंजूरी दिल्याने अखेर दोघांचे मार्ग वेगवेगळे झाले आहेत. कौटुंबिक न्यायालयात दोघांचा घटस्फोट झाला असून दोघेही आता कायदेशीररिच्या वेगळे झाले आहेत. करिश्मा कपूरने २००३ मध्ये उद्योजक संजय कपूर याच्याशी विवाह केला. मात्र या दोघांमधील वादामुळे हा विवाह फार काळ टिकू शकला नाही. या दोघांनीही २०१४ मध्ये एकमेकांपासून सामंजस्याने घटस्फोट घेण्यासाठी वांद्रे कुटुंब न्यायालयात अर्ज केला होता. सोमवारी करिश्मा आणि संजयने सामंजस्याने विवाह संपुष्टात आणला. दोन्ही मुलांची कस्टडी करिश्माला सोपवण्यात आली आहे.

पोटगी म्हणून काय काय मिळाले करिश्माला...
- घटस्फोटानंतर मुलांच्या नावावर १० कोटी रुपयांचा ट्रस्ट करण्यात आला असून करिश्मा ज्या डुप्लेक्समध्ये वास्तव्याला आहे, तो तिच्या नावी करण्यात आला आहे.
- याशिवाय संजयला मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च उचलावा लागणार आहे.
- घटस्फोटानंतर करिश्मा केवळ तिचेच दागिने नाहीत, तर लग्नाच्यावेळी तिला सासरकडून मिळालेले दागिनेसुद्धा तिच्याकडे ठेऊ शकते.
- दोन्ही मुले समायरा आणि कियान करिश्माकडे राहतील. त्यांना भेटण्याची परवानगी संजयला देण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, वर्षातून दोन ते तीन महिने मुले संजयकडे राहू शकतील.
मुंबईत दाखल केली होती घटस्फोटाची याचिका
- करिश्मा आणि संजयच्या घटस्फोटाची सुनावणी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयात झाली.
- करिश्मा आणि संजयने सामंजस्याने विवाह संपुष्टात आणण्यासाठी केलेल्या अर्जात दोघांनाही मुलांना वाटेल तेव्हा भेटण्याची तरतूद केली होती.
- तसेच मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी ट्रस्ट फंडमध्ये असलेल्या संजयच्या आर्थिक हिश्शातील काही हिस्सा मुलांच्या नावे जमा करण्यासंदर्भातही अर्जात नमूद करण्यात आले होते.
- मुले सज्ञान झाल्यावर दोघेही ट्रस्ट फंडचे ट्रस्टी म्हणून जाहीर करण्याची अटही करिश्माने संजयला घातली होती. - मात्र नंतर करिश्माला स्वत:लाच ट्रस्ट फंडचे मालकी हक्क हवे होते. भविष्यात मुलांचे आणि संजयचे कोणत्याही प्रकारचे संबंध असू नयेत म्हणून करिश्माने हे पाऊल उचलल्याचे कळले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सोमवारी मुंबईतील कौटुंबिक न्यायालयाबाहेर क्लिक झालेली संजय-करिश्माची छायाचित्रे... आणि सोबतच वाचा, याप्रकरणातील घडामोडी...