आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karishma Kapoor Files Dowry Harassment Case Against Sunjay Kapoor!

करिश्मा कपूरचा पती व सासूवर हुंडासाठी छळ केल्याचा आरोप, तक्रार दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करिश्मा कपूर आणि संजय कपूर - Divya Marathi
करिश्मा कपूर आणि संजय कपूर
मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर व संजय कपूर यांच्या घटस्फोट प्रकरणाने नव‍ीन वळण घेतले आहे. पैशांसाठी लग्न केल्याचा आरोप सहन केलेल्या करिश्माने आता संजय आणि त्याची आई राणी सुरिंदर कपूर यांच्या विरुद्ध हुंड्यासाठी छळ केल्याची तक्रार दाखल केली आहे.
खार पोलिसांत दाखल केली तक्रार...
- सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या आठवड्याच्या सुरुवातीला करिश्माने खार पोलिसांत पती व सासूने हुंड्यासाठी मानसिक छळ केल्याची तक्रार दाखल केली.
- तक्रारीची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी करिश्माचा जबाब नोंदवून FIR (No. 98/16) दाखल केली आहे.
- करिश्माचा जबाबाच्या आधारे पोलिसांनी हुंड्याची कलम 498 (A) आणि कलम 34 अंतर्गत तक्रार दाखल करून घेतली.
- कलम 498 (A) पती किंवा सासरच्या एखाद्या नातेवाईकाच्या विरोधात दाखल करण्यात आली आहे.
- भारतीय दंड संहितेच्या कलम 34चा संबंध कॉमन इंटेन्शनचा आहे.
दुस-या महिलेसोबत राहिल्याचा आरोप...
- कथितरित्या करिश्माने संजयवर परस्त्रीसोबत राहिल्याचासुध्दा आरोप लावला आहे.
- करिश्माचा म्हणणे आहे, की संजय विवाहित असूनदेखील दिल्लीमध्ये परस्त्री आणि तिच्या मुलांसोबत राहतो.
मुलांसाठी मागितली 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम...
- करिश्माच्या सांगण्यानुसार, तिने न्यूज रिपोर्ट्समध्ये वाचले, की तिच्या 10 लाखांपेक्षा जास्त रक्कम मागितल्याचा आरोप लावण्यात आला.
- परंतु हे पैसे मी स्वत:साठी नव्हे तर माझ्या मुलांसाठी मागितले होते.
संजय कपूरने केली आहे केस शिफ्ट करण्याची मागणी...
संजय कपूरने सुप्रीम कोर्टाकडे मागणी केली आहे, की त्याचे घटस्फोट प्रकरण मुंबईहून दिल्लीला शिफ्ट करावे.
- संजयचे म्हणणे होते, की मुंबईमध्ये त्याच्या जिवाला धोका आहे. सध्या ही केस वांद्रा (मुंबई) कौंटुंबिक न्यायालयात चालू आहे.
- संजयच्या सांगण्यानुसार, जेव्हापासून त्याने मुंबईच्या कोर्टात घटस्फोटासाठी याचिका दाखल केली तेव्हापासून त्याला अंडरवर्ल्ड डॉन रवी पूजारीकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत.
- या प्रकरणात त्याने दिल्ली पोलिसांकडे तक्रारसुध्दा दाखल केली होती.
- सुप्रीम कोर्टाने संजयची याचिका मंजूर करून दिल्ली पोलिसांकडे स्टेटस रिपोर्टची मागणी केली होती.
- मात्र, करिश्माला या प्रकरणात कोणतीही नोटीस देण्यात आली नाही.
कोण आहे संजय कपूर?
- Sixt इंडियाचे (या Sona Mobility Services Ltd.) सीईओ आहे. हा सोना ग्रुपचा एक पार्ट आहे.
- सोना कोयो स्टीअरिंग सिस्टम्स लिमिटेडचा व्हाइस चेअरमनसुध्दा आहे. ही एक मल्टीनॅशनल कंपनी आहे.
- याच्या 16 प्लांट्स भारत, 3 जर्मनी आणि 1 यूएसएमध्ये आहे.
2012पासून विभक्त आहेत करिश्मा-संजय...
- करिश्माने 29 सप्टेंबर 2003ला उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केले. हे करिश्माचे पहिले
तर संजयचे दुसरे लग्न होते.
- 2012मध्ये दोघे विभक्त झाले. करिश्मा आई बबितासोबत मुंबईमध्ये राहते.
- नोव्हेंबर 2015मध्ये दोघांनी कौटुंबिक न्यायालयातून घटस्फोटाची याचिचा मागे घेतली होती. संजयने काही फायनान्शिअल कमिटमेंट्स पूर्ण न केल्याने असे झाले.
- संजयने मुंबईच्या वांद्रा कोर्टात डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.
घटस्फोट याचिकेत संजयने करिश्मावर लावले आरोप, 'पैशासाठी केले होते लग्न'
- संजयने आरोप लावले होते, की करिश्मा कधीच चांगली पत्नी आणि आई होऊ शकली नाही.
- याचिकेत संजयने आरोप लावले होते, 'करिश्माने केवळ पैशांसाठी आणि ऐशो-आरामासाठी माझ्याशी लग्न केले होते.'
- तो असेही म्हणाला होता, की ती मुलांचा वापर पैसे मिळवण्यासाठी करत आहे. करिश्माने माझ्या आजारी वडिलांनासुध्दा भेटू दिले नाही.
- संजयच्या सांगण्यानुसार, मुलांची वाट पाहून त्याच्या वडिलांचे 6 महिन्यांपूर्वी निधन झाले.
संजयच्या आरोपांवर भडकले होते करिश्माचे वडील...
- संजयने याचिकेत म्हटले आहे. यावर करिश्माचे वडील रणधीर कपूर यांनी आपली प्रतिक्रिया देताना म्हटले होते, "आमच्याविषयी सर्वांना ठाऊक आहे. आम्ही इतरांच्या पैशांवर जगणारी माणसं नाहीत. देवाच्या कृपेने आमच्याकडे पैसा आणि टॅलेंट दोन्ही आहे."
- संजयने नव्याने दाखल केलेल्या घटस्फोटाच्या याचिकेत म्हटले होते, की करिश्माने अभिषेक बच्चनसोबत साखरपुडा तुटल्यानंतर माझ्याशी लग्न केले. मात्र करिश्मा एक चांगली पत्नी, आई आणि सून होऊ शकली नाही.
- एका इंग्रजी वृत्तपत्राशी केलेल्या बातचितमध्ये रणधीर म्हणाले होते, "संजय थर्ड क्लास माणूस आहे. करिश्माचे संजयशी लग्न व्हावे, अशी माझी मुळीच इच्छा नव्हती."
- ''संजय एक छंदी माणूस आहे. त्याने कधीच आपल्या पत्नीची काळजी घेतली नाही. इतर महिलांसोबत त्याचे संबंध होते. संपूर्ण दिल्लीला त्याच्याविषयी ठाऊक आहे. यापेक्षा मी आणखी जास्त काय सांगू.''

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, करिश्माचा वकील म्हणाल्या चुकीचे आहेत आरोप...