आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिश्मा तूर्त चित्रपट करणार नाही, बहीण करिना कपूर खानची माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बहीण करिश्मा कपूर सध्या तरी चित्रपटात काम करणार नाही, अशी माहिती अभिनेत्री करिना कपूर हिने नुकतीच दिली आहे. 'बजरंगी भाईजान' या चित्रपटाच्या प्रमोशनानिमित्त एका कार्यक्रमात ती बोलत होती. हा चित्रपट ईदला प्रदर्शित होणार आहे.

करिना म्हणाली, करिश्मा सध्या सुखी आयुष्य जगत आहे. तिला अनेेकांकडून चित्रपटांसाठी विचारणा करण्यात आली आहे. मात्र, सध्या तरी बॉलीवूडमध्ये काम करण्याच्या मन:स्थितीत ती नाही. मुलांसाेबत तिचा चांगला वेळ जात आहे. जर तिला चित्रपटात काम करण्याची इच्छा झाली, तर ती स्वत: याबाबत माहिती देईल. सध्या तिच्याकडे अनेक कंपन्यांच्या जाहिराती आहेत. त्यामुळे यातूनच तिला वेळ मिळत नाही. सध्या ती पहिल्यापेक्षाही अधिक सुंदर दिसत असल्याचेही करिनाने सांगितले.

पुढे वाचा.. २०१२ मध्ये करिश्माने 'डेंजरस इश्क' या चित्रपटातून पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला होता.