आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Karisma, Sunjay Try To Solve Their Matrimonial Dispute Amicably

सुप्रीम कोर्टात करिश्मा-संजयमध्ये तडजोड, कुणाला मिळणार मुलांची कस्टडी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संजय आणि करिश्मा कपूर यांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर शुक्रवारी (8 एप्रिल) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. - Divya Marathi
संजय आणि करिश्मा कपूर यांच्या घटस्फोटाच्या याचिकेवर शुक्रवारी (8 एप्रिल) सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.
नवी दिल्ली: करिश्मा कपूर आणि तिचा पती संजय कपूर यांच्या घटस्फोट याचिकेवर शुक्रवारी तडजोड झाली आहे. दोघांनी सामंजस्याने विभक्त होण्यासाठी तयार आहे. दोघांमध्ये मुलांच्या कस्टडीसाठी वाद होता. तडजोडीनुसार, दोन्ही मुले करिश्माकडे राहतील. संजयला मुलांना भेटण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सुप्रीम कोर्टात का गेले प्रकरण...
- करिश्मा आणि संजय यांच्या लग्नाला 14 वर्षे झालीत. दूरावा निर्माण झाला आणि दोघांमधील वाद कोर्टापर्यंत पोहोचला.
- दोघांनी मुंबईत घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. परंतु संजयने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करून सांगितले होते, की या प्रकरणाची सुनावणी दिल्लीत व्हावी. कारण त्याला मुंबईमध्ये रवी पुजारीकडून धमकी मिळत आहे.
गुरुवारी रात्री उशीरापर्यंत चालू होती बातचीत...
- एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार, गुरुवारी (7 एप्रिल) रात्री संजय आणि करिश्माने वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये जवळपास काही मुद्यांवर चर्चा झाल्यानंतर संमती झाली होती. समायरा आणि कियानच्या कस्टडीचा वाद सकाळी सोडवण्यात आला.
- मुले सध्या करिश्माकडे राहतात. दोघांमधील वादाचे सर्वात मोठे कारण मुलांच्या कस्टडीचा
होता.
काय म्हणाले होते करिश्माचे वकील?
- करिश्माच्या वकीलांनी गुरुवारी रात्री सांगितले होते, 'आशा आहे, की दोघांमध्ये सामंजस्याने मुद्दे सोडवले जात आहेत. आम्ही रात्री उशीरापर्यंत बातचीत केली.'
- दिल्ली हायकोर्टाने दोघांना आधीच सल्ला दिला होता, की ते एकमेकांशी बोलून हा वाद सोडवू शकतात.
- करिश्माने 2012मध्ये संजयचे घर सोडले होते. सध्या ती आई-वडिलांकडे मुंबईत राहते. संजय दिल्लीत राहतो.
मुंबईत चालू होता खटला?
- करिश्मा आणि संजय यांच्यातील घटस्फोट आणि मुलांच्या कस्टडीचा वाद मुंबईच्या एका कोर्टात सुरु होता.
- निर्णय येण्यापूर्वीच दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप लावले.
- सुप्रीम कोर्टाने संजय-करिश्माच्या वकीलांना तडजोडीसाठी अटी तयार करण्यास सांगितल्या होत्या.
- करिश्मा कपूरने पती संजय आणि तिच्या सासूच्या विरोधात हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप लावून तक्रार दाखल केली होती.
2012पासून विभक्त आहेत करिश्मा-संजय...
- करिश्माने 29 सप्टेंबर 2003ला उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न केले. हे करिश्माचे पहिले
तर संजयचे दुसरे लग्न होते.
- 2012मध्ये दोघे विभक्त झाले. करिश्मा आई बबितासोबत मुंबईमध्ये राहते.
- नोव्हेंबर 2015मध्ये दोघांनी कौटुंबिक न्यायालयातून घटस्फोटाची याचिचा मागे घेतली होती. संजयने काही फायनान्शिअल कमिटमेंट्स पूर्ण न केल्याने असे झाले.
- संजयने मुंबईच्या वांद्रा कोर्टात डिसेंबरमध्ये पुन्हा एकदा घटस्फोटाचा अर्ज दाखल केला.
घटस्फोट याचिकेत संजयने करिश्मावर लावले आरोप, 'पैशासाठी केले होते लग्न'
- संजयने आरोप लावले होते, की करिश्मा कधीच चांगली पत्नी आणि आई होऊ शकली नाही.
- याचिकेत संजयने आरोप लावले होते, 'करिश्माने केवळ पैशांसाठी आणि ऐशो-आरामासाठी माझ्याशी लग्न केले होते.'
- तो असेही म्हणाला होता, की ती मुलांचा वापर पैसे मिळवण्यासाठी करत आहे. करिश्माने माझ्या आजारी वडिलांनासुध्दा भेटू दिले नाही.
- संजयच्या सांगण्यानुसार, मुलांची वाट पाहून त्याच्या वडिलांचे 6 महिन्यांपूर्वी निधन झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, संजयच्या आरोपांवर भडकले होते करिश्माचे वडील...