आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिना-आदित्यचा हा सिजलिंग अंदाज बघताना तुम्हाला पडेल सगळ्यांचा विसर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा सिझलिंग अंदाज... - Divya Marathi
आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांचा सिझलिंग अंदाज...
कतरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूर ही जोडी 'फितूर' या सिनेमातून लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र येतेय. त्यांच्या या सिनेमातील एक नवे गाणे नुकतेच रिलीज झाले आहे. 'पश्मिना...' हे शब्द असलेल्या या गाण्यात कतरिना आणि आदित्य या दोघांचीही जबरदस्त केमिस्ट्री बघायला मिळत असून ही जोडी चांगली दिसतीये. या गाण्यात दोघांचा सिझलिंग डान्स बघायला मिळतोय. हे गाणे बघताना नक्कीच तुम्हाला इतर गोष्टींचा विसर पडणारेय.
या सिनेमातील गीते गीतकार स्वानंद किरकिरे यांनी लिहिली असून अमित त्रिवेदी याने संगीत दिलंय. तर अमित त्रिवेदी यानेच हे गाणे गायले आहे. यापूर्वी रिलीज झालेले अरिजीत सिंगच्या आवाजातील ‘ये फितूर मेरा’ हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस पडले आहे.
‘फितूर’ या सिनेमात आदित्य रॉय कपूर आणि कतरिना कैफ यांच्यासोबतच तब्बू आणि लारा दत्ता यांच्याही भूमिका आहेत.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा सिनेमातील या मस्त गाण्याचा व्हिडिओ आणि सोबतच छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...