आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रूर हुकूमशहाबरोबर पोज देताना दिसल्या कतरिनासह इतर अॅक्ट्रेसेस, समोर आले PHOTO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कतरिना कैफ सध्या तिच्या अपकमिंग चित्रपट 'जग्गा जासूस'मुळे चर्चेत आहे. अनेक दिवसांनंतर ती एक्स बॉयफ्रेंडबरोबर रणबीर कपूरबरोबर पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर कतरिना आणि रणबीरचे प्रमोशनचे फोटो व्हायरल होत आहेत. पण सोशल मीडियावर सध्या एक कतरिनाचा एक वेगळाच फोटोदेखिल व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये कतरिना लिबियाचा हुकूमशहा राहिलेल्या मुअम्मर गद्दाफीबरोबर दिसत आहे. मॉडेल शमिता सिंघाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा फोटो शेयर केला आहे. 

कतरिनाबरोबरच नेहा धुपिया आणि आदिती गोवित्रीकर.. 
- या फोटोमध्ये कतरिना गद्दाफीच्या डाव्या बाजुला दिसत आहे, तर उजव्या बाजुला नेहा धुपिया बसलेली आहे. तर काही मॉडेल्स उभ्या असलेल्या दिसत आहेत. त्यात आदिती गोवित्रीकर, आंचल कुमार यांचा समावेश आहे. 
- फोटोबरोबर शमिताने लिहिले होते, 15 वर्षांपूर्वी आम्ही सर्व एका फॅशन शोसाठी लिबियाला गेलो होतो, त्याठिकाणी आम्ही मिस्टर गद्दाफी यांना भेटलो होतो. गर्ल्स ही ट्रीप आठवते का...

कोण होता गद्दाफी.. 
जगभरात क्रौर्याचे दुसरे नाव म्हणून लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गद्दाफीला ओळखले जात होते. त्याला 20 ऑक्टोबर 2011 ला होमटाऊन सिर्तमध्ये मारले होते. त्याने 42 वर्ष लिबियावर राज्य केले. गद्दाफीने 1969 मध्ये लिबियात इदरीसचे सत्ता पालट करत सत्ता मिळवली होती. त्यावेळी तो लष्करात कॅप्टन होता. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा, मॉडेलिंग करताना कशी दिसायची कतरिना..
 
हेही वाचा..
 
 
बातम्या आणखी आहेत...