आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समोर आला 'बार-बार देखो'चा न्यू Look, समुद्रात फुलले कॅट-सिद्धार्थ प्रेम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बार-बार देखो'च्या नवीन लूकमध्ये कतरिना आणि सिद्धार्थ - Divya Marathi
'बार-बार देखो'च्या नवीन लूकमध्ये कतरिना आणि सिद्धार्थ
मुंबई: कतरिना कैफ आणि सिद्धार्थ मल्होत्राच्या 'बार बार देखो' हा आगामी सिनेमा पार्टी स्टार्टर 'काला चश्मा' गाण्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, सिनेमाचा ट्रेलर अद्याप लाँच झाला नाहीये. परंतु सिनेमाचा नवीन आणि हॉट लूक समोर आला आहे.
ओसाड बीचवर रोमान्स करताना दिसले कॅट-सिद्धार्थ...
काला चश्मा गाण्यातील कतरिनाचा डान्स लोकांनी खूप पसंत केला. आता सिनेमाच्या नवीन लूकमध्ये कतरिना आणि सिद्धार्थ रोमान्स करताना दिसत आहेत. कतरिना आणि सिद्धार्थने सोशल मीडियावर सिनेमाच्या नवीन लूकचा फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये कतरिना कैफने बिकिनी परिधान केली असून दोघे एका ओसाड बीचवर रोमान्स करताना दिसत आहेत. हा सिनेमा 9 सप्टेंबरला रिलीज होणार आहे.
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन या सिनेमाचा सहनिर्माता आहे. सिनेमाचा नवीन लूक शेअर करून कतरिनाने आपल्या पेजवर लिहिले, 'Thank you guys for all the love for Kala Chashma 😍 Trailer coming soon… Sidharth Malhotra Baar Baar Dekho'
तसेच सिद्धार्थ कतरिनासोबत समुद्रात दिसत असलेल्या फोटोसह लिहिले, 'Falling deep into love @BaarBaarDekho_ trailer out soon ! #KatrinaKaif'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमातील कतरिना-सिद्धार्थचा लूक...
बातम्या आणखी आहेत...