Home »News» Katrina Kaif Will Never Work With Ranbir Kapoor Again

कतरिना म्हणाली, 'भविष्यात कधीही करणार नाही रणबीरबरोबर काम'

दिव्य मराठी वेब टीम | Jun 19, 2017, 13:43 PM IST

  • कतरिना कैफ आणि रणबीर कपूर.
मुंबई - रणबीर कपूर आणि कतरिना कैफ यांचा मोस्ट अवेटेड चित्रपट 'जग्गा जासूस' पुढील महिन्यात रिलीज होत आहे. दोघांनी ब्रेकअपनंतर या चित्रपटात काम केले आहे. मात्र कतरिनाने स्पष्टपणे सांगितले आहे की, ती यापुढे रणबीरबरोबर काम करणार नाही. एका प्रसिद्ध वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, कतरिनाने नुकतेच एका इव्हेंटमध्ये म्हटले होते की, रणबीरबरोबर काम करणे फारच कठीण आहे.
काय म्हणाली नेमकी..
- कतरिनाला रणबीरबरोबर फ्युचरमध्ये काम करणार का असे विचारले होते. त्यावर कतरिना म्हणाली, हे फारच कठीण आहे. यावेळी रणबीरचे हाव भाव पाहून त्यालाही भविष्यात कतरिनाबरोबर काम करण्याची इच्छा नसल्याचे वाटत होते.
- दोघांच्या क्लोज असलेल्या एका डायरेक्टरच्या मते, कतरिना आणि रणबीरकडे तसेही एकत्र काम करण्यासाठी डेट आणि टाइमही नाही.
- कतरिना 'टायगर जिंदा है' आणि 'ठग्स ऑफ हिन्दोस्तां' मध्ये काम करतेय. तर रणबीर संजय दत्तच्या बायोपिक आणि अयान मुखर्जीच्या 'ड्रैगन'मध्ये बिझी आहे.

यामुळे लांबले 'जग्गा जासूस'चे रिलीज..
अनुराग बासूच्या दिग्दर्शनात तयार झालेला हा चित्रपट आधी नोव्हेंबर 2016 मध्ये रिलीज होणार होता. पण रणबीर-कतरिना यांच्यातील दुराव्यामुळे शुटिंग वेळेत पूर्ण झाली नाही, अशी चर्चा आहे. चित्रपटात रणबीर आणि कतरिनाशिवाय सयानी गुप्ता, सौरभ शुक्ला आणि करणदेखिल महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 14 जुलैला हा चित्रपट रिलीज होतोय.
पुढील स्लाइड्सवर, वर्षे रपिलेशनशिपमध्ये राहिले कतरिना-रणबीर...

Next Article

Recommended