आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

VIDEO: रिलीज झाला सैफ-कतरिना स्टारर 'फँटम'चा TRAILER

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिग्दर्शक कबीर खानचा आगामी 'फँटम' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. सैफ अली खान आणि कतरिना कैफ स्टारर हा दहशतवादावर आधारित अॅक्शन ड्रामा सिनेमा आहे. ट्रेलरमध्ये सैफ-कॅट अॅक्शन अवतारात दिसणार आहेत.
साजिद नाडियाडवाला आणि सिध्दार्थ रॉय कपूर यांच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनर अंतर्गत तयार होणारा हा सिनेमा 26/11 मुंबई हल्ल्यावर आधारित आहे. ट्रेलरमध्ये एजेंट बनून सैफ-कॅट पाकिस्तानमध्ये जाऊन दहशतवादांचा सूड उगवतात. ट्रेलरमध्ये सैफ 'अमेरिकेने ओसामाला मध्ये जाऊन मारले होते तर हे काम आपण कसे करू शकत नाही.' सैफ असेच काही दमदार डायलॉग्स बोलताना दिसणार आहे. 28 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.
सैफ-कॅटची जोडी 'रेस'मध्येसुध्दा दिसली होती. तसेच पहिल्यांदा सैफ दिग्दर्शक कबीर खानसोबत काम करत आहे. कतरिनाने यापूर्वी कबीर खानसोबत 'एक था टायगर' आणि 'न्यूयॉर्क' सिनेमात काम केले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'फँटम'च्या ट्रेलरची झलक...