आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अमृतासिंहच्या भेटीनंतर अभिषेक कपूरचा खुलासा, केदारनाथचे सेकंड शेड्यूल लवकरच सुरु होणार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सारा अली खान आणि सुशांत सिंह राजपूत स्टारर 'केदारनाथ'ची जेव्हा पासून घोषणा झाली आहे, तेव्हापासून या फिल्मची चर्चा आहे. डायरेक्टर अभिषेक कपूरच्या दिग्दर्शनात तयार होत असलेल्या या फिल्ममधून अमृतासिंह आणि सैफ अली खानची मुलगी सारा अली खान डेब्यू करत आहे. पुढील वर्षी रिलीज होणाऱ्या या फिल्मचे फर्स्ट शेड्यूल रॅपअप झाले आहे.  दुसरे शेड्यूल लवकरच सुरु होणार आहे. 

 

आता सुरु होणार सेकंड शेड्यूल... 
- अभिषेक कपूरने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर सारा आणि सुशांतचा एक फोटो पोस्ट करत फिल्मच्या सेकंड शेड्यूलीच माहिती शेअर केली आहे. त्याने लिहिले,  "Great 2 have these 2 back in the office again.. they seem to electrify the place everytime they come in.. prep starts on 2 nd sched #kedarnath #kedarnaththemovie #jaibholenath #shambhoo #sushantsinghrajput #saraalikhan #init2winit."

 

'केदारनाथ' आधी पुढील वर्षी जूनमध्ये रिलीज होणार होती. मात्र आता ही फिल्म पुढील वर्षाच्या अखेरीस रिलीज होणार आहे. फिल्मचे काही महत्त्वाचे सीन्स शूट करण्यासाठी निर्मात्यांनी हा निर्णय घेतला आहे. 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या महापूरावर आधारीत ही फिल्म आहे. पुराचे काही सीन शुट करण्यासाठी फिल्मची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. दरम्यान, अशीही चर्चा आहे, की साराची आई- अमृतासिंहने अभिषेकची नुकतीच भेट घेऊन लेकीच्या डेब्यू फिल्मचे काम लवकर उरकण्यास सांगितले होते. 

बातम्या आणखी आहेत...