आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\'चा स्टंट ट्राय करत होता; हत्तीने असे हवेत फेकले, डोके-मानेसह अनेक हडांचा झाला चुराडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाहुबलीतील स्टंट सीन करताना प्रभास. दुसऱ्या फोटोत केरळमधील व्यक्तीला हत्तीने फेकले. - Divya Marathi
बाहुबलीतील स्टंट सीन करताना प्रभास. दुसऱ्या फोटोत केरळमधील व्यक्तीला हत्तीने फेकले.
मुंबई/कोच्ची - एस.एस. राजामौलीची फिल्म 'बाहुबली'चा स्टंट सीन करण्याचा प्रयत्न एकाच्या जीवावर बेतण्याची वेळ आली होती. फिल्मच्या एका सीनमध्ये प्रभास हत्तीची सोंड पकडून त्याच्या डोक्यावर चढतो. फिल्ममधील हा सीन केरळमधील थोडापुझा येथील एका व्यक्तीने अनट्रेंड हत्तीसोबत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हत्तीने त्याला सोंडीवरुन असे फेकले की त्याच्या हडांचा चुराडा झाला. या व्यक्तीला सध्या हॉस्पिलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती नाजूक आहे. 
 
कित्येक फूट हवेत फेकले
- केरळमधील या व्यक्तीने आधी हत्तीला खाऊ घातले आणि त्यानंतर 'बाहुबली'चा स्टंट सीन ट्राय केला. त्याने हत्तीची सोंड पकडून त्यावर चढण्याचा प्रयत्न केला तेव्हा हत्ती भडकला आणि त्याने प्रभासीच नक्कल करणाऱ्या व्यक्तीला कित्येक फूट हवेत फेकले. 
- हत्तीने सोंडेने हवेत फेकल्यानंतर जमीनीवर आदळलेल्या या व्यक्तीचे डोके फुटले. त्याची अनेक हडे मोडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 
 
स्टंटमॅन आणि व्हिएफएक्स तंत्राने शूट झाला होता सीन 
- बाहुबलीमध्ये हत्तीच्या सोंडेने त्याच्या डोक्यावर चढण्याचा सीन अनेक स्टंटमॅन आणि तंत्रज्ञांच्या सहाय्याने करण्यात आला होता.  
- सीन शूट करण्यासाठी ट्रेंड हत्ती बोलवण्यात आला होता. त्यासोबतच त्यात परफेक्शन यावे यासाठी व्हीएफएक्स तंत्राचा वापर करण्यात आला होता.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, हत्तीने फेकल्यानंतर कसा पडला जमीनीवर.. 
बातम्या आणखी आहेत...