आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ते राक्षसी कृत्य पाहून रक्त सळसळले.. मीही मुलीचा बाप.. बंगळुरू घटनेवर संतापला खिलाडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बेंगळुरुत महिला आणि तरुणींबरोबर झालेल्या सामुहिक छेडछाड प्रकरणावर खिलाडी अक्षय कुमार याने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी अक्षय केप टाऊनला गेला होता. त्याठिकाणाहून परतल्यानंतर त्याला हे समजले त्यानंतर ट्वीटरवर एक व्हिडीओ शेअर करत याबाब प्रतिक्रिया दिली. 

आपण माणूस आहोत की प्राणी अशा शब्दांत अक्षयने या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. मीही एका मुलीचा बाप आहे असे म्हणत अक्षयने असे कृत्य करणाऱ्यांवर शब्दाचे आसूड ओढले. विशेष म्हणजे या घटनेनंतर सपाच्या अबू आझमी यांनी मुलींचे कपडे वागणूक यावर आक्षेप घेतला होता, त्याचाही समाचार अक्षयने घेतला. शेवटी तरुणींनी स्वरक्षणासाठी मार्शल आर्टस शिकण्याचा सल्लाही दिला. संपूर्ण व्हिडीओमध्ये अक्षयचा राग स्पष्ट जाणवत होता. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, काय म्हणाला अक्षय बंगळुरूतील घटनेवर अखेरच्या स्लाइडवर पाहा व्हिडीओ...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...