आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'की एंड का\'चे मोशन पोस्टर रिलीज, करीनाने अर्जुनला घातले \'मंगळसूत्र\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करीना कपूर आणि अर्जुन कपूर - Divya Marathi
करीना कपूर आणि अर्जुन कपूर
करीना कपूर आणि अर्जुन कपूर स्टारर 'की एंड का' सिनेमाचे पहिले मोशन पोस्टर रिलीज झाले आहे. पोस्टरमध्ये करीना, अर्जुनला मंगळसूत्र घालताना दिसली. हे पोस्टर अमिताभ बच्चनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहे. सिनेमात बिग बी आणि जया बच्चन कॅमियो रोलमध्ये दिसणार आहेत. (येथे क्लिक करून पाहा मोशन पोस्टर)
करीनाला झाला 'सच्चीवाला प्यार...'
करीनाने आपल्या इंस्टाग्रामवर हे पोस्टर शेअर करून लिहिले, 'sacchi wala pyar!!'. पोस्टरसोबत सिनेमाची रिलीज डेटसुध्दा समोर आली आहे. 1 एप्रिलला सिनेमा रिलीज होत आहे.
यापूर्वी सिनेमाचा पहिली लूक अर्जुन कपूरने इंस्टाग्रामवर शेअर केला होता. दिग्दर्शक आर. बाल्कीच्या या सिनेमात करीना पहिल्यांदा मेट्रो सेंट्रिक कॅरेक्टरमध्ये दिसणार आहे. ती कॉर्पोरेट कंपनीत उच्चपदावर काम करणा-या 'किआ'च्या भूमिकेत झळकणार आहे. सिनेमात करीना घरातील मुख्य व्यक्ती असून पैसे कमावते. तसेच 'कबीर' (अर्जुन कपूर) घर सांभाळतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अर्जुन-करीनाचे काही फोटो...