आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुसऱ्या महिलेसाठी या अभिनेत्रीला पतीने सोडले, कामाच्या शोधात परतली मुंबईत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पती अली पुंजानीसोबत किम शर्मा - Divya Marathi
पती अली पुंजानीसोबत किम शर्मा
मुंबई - मोहब्बते फेम अभिनेत्री किम शर्माला पती अली पुंजानीने एका दुसऱ्या महिलेसाठी सोडल्याचे समजत आहे. ती महिला कोण याबाबत कोणतीही माहिती  सध्या समोर आलेली नाही. हॉटेल व्यावसायिक अली पुंजानीसोबत विवाह केल्यानंतर किम केनियात सेटल झाली होती. पण आता किम मुंबईत परतली असून तिने बॉलिवूडमध्ये पुन्हा काम शोधण्यास सुरुवात केली आहे.
 
अलीसोबत लग्न केल्यानंतर किमने तिचे बॉलिवूड करिअर सोडून दिले होते आणि ती अलीला बिझनेसमध्ये मदत करत होती. अलीच्या हॉटेल चेनची ती सीईओ होती. पण आता घर, पदभार सर्व सोडून परत आल्यामुळे किमला आर्थिक चणचण भासत आहे. किम मुंबईतच काम करुन तिथेच बिझनेस करु इच्छित आहे असे समजते. 
 
मुंबईच्या फॅशन डिजाईनरसोबत जुळले नवीन नाते..
 
किम मुंबईला आल्यानंतर तिचे नाव मुंबईतील फॅशन डिजाईनर अर्जून खन्नासोबत जोडले जात आहे. दोघांना अनेकवेळा सोबत पाहण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर 21 जानेवारी 2017 ला आपल्या वाढदिवशी किम अर्जूनसोबत गोव्याला होती. अर्जून खन्ना हा विवाहित आहे आणि त्याच्या पत्नीचे नाव शेफाली आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा कोण आहे किमचा पती अली पुंजानी..
बातम्या आणखी आहेत...