आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, \'सैराट\'ला पछाडत OSCARमध्ये एन्ट्री मिळवणा-या रजनीकांतच्या जावयाच्या फिल्मच्या 11 गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः भारतीय सिनेसृष्टीत यंदा उत्तम कथा असणारे सिनेमे पाहावयास मिळाले. यंदाच्या ऑस्कर अवॉर्डसाठी अनेक सिनेमांची चर्चा होती. मात्र, ‘विसारानाइ’ या तामिळ सिनेमाने या शर्यतीत बाजी मारली. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘विसारानाइ’ या तामिळ सिनेमाचे नाव पुढील वर्षीच्या ऑस्कर महोत्सवातील विदेशी भाषिक चित्रपटांच्या श्रेणीत भारताच्या अधिकृत प्रवेशिकेच्या स्वरूपात पाठवण्यात आले आहे.
या श्रेणीत स्पर्धेत असलेल्या 29 सिनेमांमधून ‘विसारानाइ’ची निवड करण्यात आल्याचे भारतीय चित्रपट महासंघाचे (फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया) सरचिटणीस सुप्रान सेन यांनी सांगितले.

दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे सुपरस्टार रजनीकांत यांचा जावई आणि अभिनेता-चित्रपट निर्माता धनुष याने तयार केलेल्या सिनेमाने मराठीतील 'सैराट', हिंदीतील 'सुल्तान', 'एअरलिफ्ट', 'फॅन' या सिनेमांना धोबीपछाड देत ऑस्करमध्ये एन्ट्री मिळवली आहे. ऑस्करमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणा-या आणि वेत्रिमारन दिग्दर्शित 'विसारानाइ’ या सिनेमाविषयीच्या खास गोष्टी आम्ही तुम्हाला या पॅकेजमधून सांगत आहोत.
चला तर मग जाणून घेऊयात 'विसारानाइ’ या सिनेमाविषयी बरेच काही...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...