आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाहुबलीची टायटल मिस्ट्री, पोस्टरमध्ये सिंगल आणि सेंसर सर्टिफिकेटमध्ये डबल \'A\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बाहुबली' आणि 'बाहुबली 2' बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. पण हे कोणाच्या लक्षातही आले नसेल की या चित्रपटाच्या पोस्टर आणि सेंसॉर सर्टिफिकेटवर टायटलचे स्पेलिंग वेगवेगळे लिहिलेले होते. 'Bahubali The Beginning' आणि 'Bahubali The Conclusion' च्या स्पेलिंगचा विचार करता यात बाहुबली नावात सिंग 'A' लिहिलेला आहे. मात्र दोन्ही चित्रपटांच्या सेंसॉर सर्टिफिकेटमध्ये डबल 'A' लिहिलेले आहे. त्याचे कारण म्हणजे करण जोहरचा  न्युमेरॉलॉजीवर खूप विश्वास आहे. त्यानेच या चित्रपटाच्या यशासाठी चित्रपटाच्या टायटलमधून एक 'A' हटवला होता. 

करणचे न्युमरॉलॉजिस्ट संजय जुमानी सांगतात की, डबल 'A' चित्रपटाच्या सक्सेससाठी योग्य नव्हते. त्यामुळे मी करणला टायटलमधून एक 'A' हटवण्यास सांगितले होते. तसेच त्यांनी बाहुबलीच्या सीक्वलमध्ये न्युमरिकल 2 ( म्हणजे  Bahubali 2) जोडण्यास सांगितले होते. आता परिणाम सर्वांसमोर आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, सलमान, हृतिक, वरुणच्या चित्रपटांच्या नावांमध्येही केला होता बदल..
 
बातम्या आणखी आहेत...