आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know How Sunny Leone And Daniel Weber's Love Story Began

पहिल्या नजरेतील प्रेम: जाणून घ्या डेनिअलसोबत कशी सुरु झाली सनीची लव्हस्टोरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सनी लिओन पती डेनिअल वेबरसोबत)
पडद्यावर सनी नेहमी बोल्ड अवतातार दिसते, परंतु ख-या आयुष्यात ती थोडी साधी आहे, असे तिचा पती डेनिअल वेबरने सांगितले. एमटीव्हीच्या स्प्लिट्सव्हिला 8च्या प्रमोशनल इव्हेंटदरम्यान सनी आणि तिचा पती डेनिअलसोबत त्यांच्या नात्यावर बातचीत केली...
दोघांच्या लग्नाला आठ वर्षे झालीत. परंतु नजेरला नजर भिडणारे प्रेम आजही कायम आहे. डेनिअल सांगतात, 'मी सनीला पहिल्यांदा लॉस वेगासच्या एका रेस्तरॉमध्ये पाहिले होते. तिथे मी माझ्या बँड शो करण्यासाठी गेलो होतो. सनी तिच्या फ्रेंड्ससोबत सुट्या घालवण्यासाठी तिथे आलेली होती. मला पहिल्याच नजरेत तिच्यावर प्रेम झाले होते.माझा एक मित्र तिला ओळखत होता.'
पुढे सनी सांगते, 'त्या दिवशी डेनिअल माझ्याकडे आला आणि माझे नाव विचारून त्याच्या टेबलवर जाऊन बसला. त्यानंतर मी जेव्हा कधी त्या रेस्तरॉमध्ये जायचे तेव्हा मला एक पुष्पगुच्छ मिळायचे. डेनिअलची हिच अदा मला भावली.'
परंतु सनीने लगेच होकार दिला नव्हता. ती सांगते, 'डेनिअल प्रत्येक सुखात-दु:खात माझ्यासोबत होता. आम्ही जेव्हा भेटलो, त्यावेळी नुकतेच माझ्या आईचे निधन झालेले होते. मी तणावाखाली होते. त्यावेळी माझील परिस्थिती आणि मी इतकी खचले होते, की कोणताही मुलगा मला पाहून सोडून गेला असता. परंतु डेनिअलने तसे केले नाही. तीन वर्षे डेट केल्यानंतर आम्ही लग्न केले. त्यानंतर माझ्या वडीलांचे निधन झाले. तेव्हासुध्दा डेनिअलनेच मला सभांळले.'
डेनिअल सांगतो, 'सनीमुळे मला माझ्या कुटुंबाची किंमत कळाली. तिच्यामुळे मी त्यांच्या जवळ येऊ शकलो.'
दोघांचे छंद सारखेच-
दोघांना अॅडव्हेंचर्स स्पोर्ट्स आवडतात. फिटनेसची काळजी घेणारे आहेत आणि दोघांनाही शॉपिंग आवडते. शॉपिंग करताना दोघांत स्पर्धा लागते, की कुणी काय खरेदी केले. घरातील एका खोलीत जिम बनवले आहे. जवळच्या जिमच्यासुध्दा मेंबरशिप घेतल्या आहेत. फावल्या वेळेत दोघे वर्कआऊट करतात. सनीला फिरायला आवडते, विशेष म्हणजे समुद्रा किना-यांसारख्या ठिकाणांवर. ती सांगते, 'मी माझ्या आई-वडिलांच्या अस्थी समुद्रात विसर्जित केल्या होत्या. तिथे गेल्यास मला भास होतो, की ते माझ्याजवळ आहेत. डेनिअल प्रत्येक वाढदिवसाला अॅडव्हेंचरस ट्रिप पॅकेज गिफ्ट करतो. मागील वर्षी आम्ही स्काय डाइव्हिंग केले होते आणि त्यापूर्वी बंजी जम्पिंग.'
सनी आणि तिचा राग-
डेनिअल सांगतो, 'सनी खूप धडसी आहे, परंतु तिचा खूप भयावह आहे. तिला जेव्हा राग येतो, तेव्हा मी तिच्यासमोर जाण्याची हिम्मतसुध्दा दाखवू शकत नाही. मला वाटते, तिचा राग कमी व्हायला हवा.' सनीचे यावर म्हणणे आहे, 'फक्त मलाच राग येतो असे नाहीये, डेनिअलसुध्दा रागीट आहे. त्यालासुध्दा खूप राग येतो. मला वाटते, की त्याने इतरांवर लगेच विश्वास न ठेवण्याची सवय मोडावी.'
अविस्मरणीय लग्न-
सनीने सांगितले, की त्यांचे लग्न परंपरेनुसार झाले. दिवसा गुरुव्दारमध्ये सप्तपदी घेतल्या आणि संध्याकाळी यहूदीच्या प्रथेनुसार लग्न केले. तीन दिवस फंक्शन चालू होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा पती डेनिअलसोबतचे सनीचे PHOTOS...