आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरच्या क्षणी एकाकी होती बॉलिवूडची \'जोहरा जबी\', मुला-मुलीनेही फिरवली होती पाठ...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वक्त' चित्रपटातील 'ए मेरी जोहरा जबी' हे क्लासिकल सुपरहिट गाणे ऐकले नसेल असा कोणी विरळाच. बलराज साहनी यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात त्यांच्यासमोर बसलेला एका लाजरा चेहरा आपण पाहिला असेल तो आहे अचला सचदेव यांचा. आज त्यांचा ९७ वा वाढदिवस आहे.
 
पतीच्या निधनानंतर एकाकी जीवन जगणाऱ्या अचला सचदेव यांच्यामुळे पुन्हा रुपेरी पडद्या मागील सत्य समोर आले आहे. आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांनी एकांतातच या जगाचा निरोप घेतला. बॉलिवूडच काय, त्यांच्या मुलांनीही त्यांच्यापासून नाते तोडले होते. त्यांच्याबद्दल खास माहिती आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. वाचा कसे होते त्यांचे जीवन... 
 
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे' चित्रपटातील सिमरन म्हणजेच काजोलच्या आजीची भूमिका केलेल्या अचला सचदेवचा जन्म ३ मे १९२० रोजी पेशावरमध्ये झाला. ३० एप्रिल २०१२ रोजी पुणे येथील एका हॉस्पीटलमध्ये त्यांचे निधन झाले होते. यावेळी युएसमध्ये राहणारा त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत नव्हता ना मुलगी. पतीच्या निधनानंतर त्यांचे जीवन एकाकी झाले होते. 
 
'ए मेरी जोहरा जबी' गाण्याने मिळाली होती प्रसिद्धी...

- अचला सचदेव यांना वक्त (1965) चित्रपटासाठी ओळखले जाते. त्यात त्यांनी बलराज साहनी यांच्या पत्नीची भूमिका केली होती. अचला आणि बलराज यांच्यावर चित्रीत करण्यात आलेले  'ए मेरी जोहरा जबी' हे गाणे फार प्रसिद्ध झाले होते, जे आजही आपल्याला सहज कुठेही ऐकायला भेटते.
 
पुढच्या ७ स्लाईडवर वाचा, अचला यांच्या आयुष्याशी निगडीत अजून काही गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...