आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बाप रे... \'मिस वर्ल्ड\'मुळे कोसळला होता बिग बींचा डोलारा, जाणून घ्या काय घडले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः अमिताभ बच्चन - Divya Marathi
फाइल फोटोः अमिताभ बच्चन
नवी दिल्ली : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना मिस वर्ल्ड स्पर्धेमुळे फार मोठे नुकसान सहन करावे लागले होते. इतकेच नाही तर त्यांचे नाव डिफॉल्टरच्या यादीतही सामील झाले होते. बिग बी यांच्या अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लिमिटेड (ABCL) कंपनीचा सुरुवातीचा बिझनेस अतिशय चांगला सुरु होता. हे यश पाहून ते टीव्ही आणि इतर क्षेत्रात उतरले होते. शिवाय त्यांच्या कंपनीने १९९६ मध्ये बंगळुरुमध्ये मिस वर्ल्ड कॉन्टेस्टचेही आयोजनही केले होते. मात्र दुर्दैवाने तो सर्वात मोठा फ्लॉप शो ठरला.
मिस वर्ल्डमुळे कोसळू लागला बिग बींचा डोलारा..
ABCL ने मिस वर्ल्ड कॉन्टेस्टचे आयोजन करणे हे अमिताभ बच्चन यांच्या आयुष्यातील सर्वात मोठा चुकीचा निर्णय ठरला होता. हा कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यातही सापडला होता. इथे काम केल्याचे पैसे मिळाले नाही, असा आरोपही काही जणांनी केला होता. कंपनीचे पैसे संपत होते. अशा परिस्थितीत ABCL ने पुन्हा बँकांकडून अतिरिक्त फंडाची मागणी केली.

पुढील स्लाईडमध्ये वाचा, बिग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये काय लिहिले...
बातम्या आणखी आहेत...