आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिरियड्सवर ट्विंकलने केलेल्या ट्वीटबाबत KRK म्हणाला, \'पागल हो गई भाभी जी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केआरके आणि ट्विंकल खन्ना. - Divya Marathi
केआरके आणि ट्विंकल खन्ना.
केआरके पुन्हा एकदा वादात अडकला आहे. यावेळी त्याने अॅक्ट्रेस ट्विकंल खन्नावर हल्ला चढवला. ट्विकंल खन्नाच्या एका ट्वीटवर त्याने लिहिले, त्या पागल झाल्या आहेत. ट्विंकल खन्ना सध्या पिरियड्सचा विषय असलेल्या 'पॅडमॅन' चित्रपटाबाबत सोशल साईट्सवर चांगलीच अॅक्टीव्ह आहे. ट्विंकलने नुकतेच ट्विटरवर एक पोस्ट करताना लिहिले होते की, 'मेन्सट्रूएशन म्हणजे पिरियड्सवर बोलण्यासाठी काही लाज वाटता कामा नये. तिच्या या ट्वीटवर केआरकेने ट्वीट केले आणि लिहिले, 'ट्विंकल खन्ना लोकांना पिरियड्सवर बोलण्याचा सल्ला देत आहे. या भाभीजी पूर्ण पागल झाल्या आहेत. त्यांना कोणीतरी हॉस्पिटलमध्ये दाखल करा. 

यापूर्वीही केआरकेने केला आहे महिलांचा अपमान 
केआरकेने ट्विटवर महिलांचा अपमान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही त्याने अनेकदा महिलांचा अपमान केला आहे. त्यामुळे ट्विटरने काही काळासाठी त्याचे अकाऊंट सस्पेंडही केले होते. पण त्याला त्याने काहीही फरक पडलेला दिसत नाही. ट्विंकल खन्ना 'पॅडमॅन' चित्रपटाची निर्माती आहे. या चित्रपटात अक्षयकुमार लीड रोलमध्ये आहे. हा चित्रपट मेन्सट्रूएशन हायजीनवर आधारित आहेत. त्यामुळे सद्या ट्विंकल सोशल मीडियावर त्याचे प्रमोशन करत आहे. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, ट्विटरवर याआधी कोणाचा अपमान केला आहे, केआरकेने..
 
बातम्या आणखी आहेत...