आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लखनौमध्ये कुणाल खेमूवर हल्ला, PAK गायकाच्या गाण्याचे चालू होते शूटिंग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शूटिंगवेळी कुणाल खेमू मिस इंडिया वर्तिका सिंहसोबत - Divya Marathi
शूटिंगवेळी कुणाल खेमू मिस इंडिया वर्तिका सिंहसोबत
लखनौ (यूपी): 'सांवरे' या अल्बमच्या शूटिंगसाठी आलेल्या अभिनेता कुणाल खेमूचे शनिवारी (11 जून) रात्री लोकांनी विरोध केला . परिस्थिती बिघडत चालली होती. लोकांनी दगडफेकसुध्दा केली. यादरम्यान कुणाल खेमू जखमी झाला. या घटनेत त्याच्या हाताला जखम झाली. काही लोकांचा इमामबाडेच्या बाहेर नौबतखाण्यात शूटिंग करण्यास विरोध होता. त्यांचे म्हणणे होते, यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जातात. या गाण्याला पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान आवाज देत आहेत. तेसुध्दा रेकॉर्डिंगसाठी लखनऊमध्ये आले होते.
नारेबाजी करत केली दगडफेक...
- लखनौमधील इमामबाडेच्या बाहेर 'सांवरे' या व्हिडिओ गाण्याचे शूटिंग सुरु होते.
- अल्बमचा निर्माता निखिल व्दिवेदीने सांगितले, की शूटिंगच्या परवानगीसाठी अर्ज दिला होता. परंतु आम्हाला परवानगी मिळाली नाही.
- त्यानंतरसुध्दा आम्ही शूट करत होतो. यादरम्यान एका समुदायाच्या लोकांनी नारेबाजी करत आमच्यावर दगडफेक केली.
- या घटनेत कुणाल जखमी झाला. त्याच्या हाताला जखम झाली आहे.
- लोकांचे म्हणणे आहे, की नकार देऊनसुध्दा आम्ही शूटिंग सुरु ठेवले. त्यामुळे दगडफेक केली.
काय म्हणतात पोलिस?
- एसएसपी मंजिल सैनी यांनी सांगितले, विना परवानगी शूटिंग सुरु होते.
- लोकांनी दगडफेक केल्याने कुणाल खेमूच्या हाताला जखम झाली.
- आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
राहत फतेह अली खान गाताय गाणे...
- या अल्बमच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खानसुध्दा लखनौला आले होते.
- गायक अनुपमा राग यांच्या म्हणण्यावरून राहत लखनऊला आले होते. अनुपमा यांनीच हे गाणे लिहिले असून म्यूझिक कम्पोज केले आहे. त्यासुध्दा स्वत: राहत यांच्यासोबत गाणे गाणार आहेत.
- व्हिडिओमध्ये कुणाल खेमू आणि मिस इंडिया वर्तिका सिंह दिसणार आहेत. 'सांवरे' आर्मी बॅकग्राऊंड असलेले गाणे आहे.
- गाण्यात कुणाल एक आर्मी ऑफिसरच्या रुपात दिसणार आहे. तसेच वर्तिका त्याची प्रेयसी आणि पत्नीची भूमिका साकारत आहे.
- पहिल्यांदाच राहत फतेह अली खान लखनौमध्ये एखाद्या गाण्याचे शूटिंग करत आहेत.
कोण आहे अनुपमा राग...?
- पार्श्वगायिका आणि कम्पोझर अनुपमा राग लखनौ डेव्हलपमेंट अॅथॉरिटीमध्ये (एलडीए) ओएसडीच्या पोस्टवर आहेत.
- त्यांच्या गाण्यावर मल्लिका शेरावत आणि माधुरी दीक्षित यांनी परफॉर्म केले आहे.
- गायनाच्या क्षेत्रातील योगदानासाठी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी अनुपमा यांना सन्मानित केले आहे.
- अनुपमा यांचे लग्न 2007मध्ये इंडियन ग्रामीण क्रिकेट लीगचे (आयजीसीएल)
चेअरमन अनराग भदौरियासोबत झाले आहे.
- अनुराग यांच्या सांगण्यावरून त्यांनी आयजीसीएलचे थीम साँग कम्पोज केले आणि गायले होते.
कोण आहे वर्तिका सिंह?
- मुंबईमध्ये झालेल्या फेमिना मिस इंडियाच्या ग्रँड फिनालेमध्ये वर्तिका सिंह सेकंड रनरअप ठरली होती.
- तिचे बँकॉकमध्ये मिस ग्रँड इंटरनॅशनल 2015च्या फायनलमध्येसुध्दा सेकंड रनरअपचा किताब नावी केला होता.
- थायलँडच्या हुआमार्क इंडोर स्टेडिअममध्ये 78 स्पर्धकांपैकी तिचे हा अवॉर्ड नावी केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा गाण्याच्या शूटिंगदरम्याचे आणि हल्ल्याचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...