Home »News» Kundan Shah Prayer Meet: Shah Rukh Khan And Other Celebs Pay Their Last Respect

दिग्दर्शकाच्या शोकसभेत मॅनेजर पूजासोबत पोहोचला शाहरुख, या कलाकारांनीही वाहिली श्रद्धांजली

दिव्य मराठी वेब टीम | Oct 11, 2017, 10:51 AM IST

  • (L) फिल्ममेकर अजीज मिर्जाला मदत करताना शाहरुख खान. मॅनेजर पूजा ददलानीसोबत प्रेयर मीटमध्ये पोहोचला शाहरुख
मुंबईः 'जाने भी दो यारो' या गाजलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शक कुंदन शाह (69) यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी मंगळवारी मुंबईतील सेंटाक्रूज वेस्ट स्थित श्री मंडळ येथे शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेता शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत कुंदन शाह यांना श्रद्धांजली वाहायला पोहोचला होता. याशिवाय अनुपमा चोप्रा, फिल्म मेकर अजीज मिर्जा, अमोल गुप्ते, सुधीर मिश्रा, सुलभा आर्या, कॉमेडियन सुनील पाल सह बॉलिवूडमधील अनेक कलाकार शोक सभेत उपस्थित होते. कुंदन शाह यांचे 7 ऑक्टोबर रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

अनेक गाजलेल्या मालिकांचे कुंदन शाह होते दिग्दर्शक...
- कुंदन शाह यांनी अनेक गाजलेल्या मालिका दिग्दर्शित केल्या होत्या. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'नुक्कड' (1986) आणि 'वागले की दुनिया' (1988) या मालिका खूप लोकप्रिय ठरल्या होत्या.
- 2014 साली रिलीज झालेला 'पी से पीएम तक' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा सिनेमा ठरला.
- कुंदन शाह यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथून शिक्षण पूर्ण केले. शाह यांना हिंदी सिनेसृष्टीत सटायरिकल (व्यंग्यात्मक) कॉमेडी इंट्रोड्यूस करण्यासाठी ओळखले जाते.
- शाह यांना राष्ट्रीय पुरस्कारासोबतच 'जाने भी दो यारो' या चित्रपटासाठी इंदिरा गांधी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.

हे चित्रपट केले होते दिग्दर्शित...
- कुंदन शाह यांनी 'जाने भी दो यारो' (1983), 'कभी हां कभी ना' (1993), 'क्या कहना' (2000), 'दिल है तुम्हारा' (2002), 'पी से पीएम तक' (2014) हे चित्रपट दिग्दर्शित केले होते.
राष्ट्रीय पुरस्कार केला होता परत...
- कुंदन शाह राष्ट्रीय पुरस्कार परत केल्यामुळे चर्चेत आले होते.
- नोव्हेंबर 2015 मध्ये देशातील इन्टॉलरेंसच्या विरोधात 23 इतर दिग्दर्शकांसह कुंदन शाह यांनी राष्ट्रीय पुरस्कार परत केला होता.

पुढे बघा, कुंदन शाह यांच्या शोकसभेत पोहोचलेल्या कलाकारांचे फोटोज...

Next Article

Recommended