जोधपुर: इंडो-चाइनीजच्या 'कुंग फू योगा' सिनेमात जॅकी चैन बॉलिवूड स्टाइलमध्ये डान्स करताना दिसणार आहे. अलीकडेच सिनेमाच्या शूटिंगचे काही फोटो समोर आले आहेत. त्यात जॅकी सिनेमाच्या इतर कलाकारांसोबत बॉलिवूड स्टाइलमध्ये डान्स करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, हा डान्स नंबर फराह खानने कोरिओग्राफ केला आहे.
फरहानने केली जॅकीची प्रशंसा...
शूटिंगनंतर फराहने जॅकी चैनच्या डान्सिंग स्टाइलची टि्वट करून प्रशंसा केली आहे. तिने लिहिले, 'मी त्यांचे नाव 'जॅकी जॅक्सन' ठेवू इच्छिते.' यापूर्वीसुध्दा फराहने जॅकी चैनसोबतचे काही फनी फोटो शेअर केले होते. त्यात दोघांनी बाँडिंग स्पष्ट दिसून येत होती.
सिनेमात जॅकी चैनसोबत बॉलिवूड अभिनेता सोनु सूद, अमायरा दस्तूर आणि दिशा पटाणीसुध्दा महत्वाच्या भूमिकेत आहेत. बीजिंग, दुबई आणि आइसलँडनंतर सिनेमाचे शेवटचे शेड्यूल जयपूरमध्ये शूट करण्यात आले. हा सिनेमा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जॅकी चैनच्या डान्सच्या काही स्टेप्स...