आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'लगान\' फेम अभिनेते राजेश विवेक यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - 'लगान' चित्रपटातून प्रसिद्धीझोतात आलेले अभिनेते राजेश विवेक यांचे गुरुवारी हैदराबादेत हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर मुंबईत शुक्रवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. लगानबरोबरच त्यांनी सन ऑफ सरदार, अग्निपथ आणि मुंबई मस्त कलंदर सारख्या इतरही गाजलेल्या चित्रपटांत भूमिका केल्या होत्या.

प्रामुख्याने टिव्ही आणि नाटकांत काम करणारे राजेश विवेक यांना लगान आणि स्वदेस सारख्या चित्रपटांतील भूमिकांमुळे ओळख मिळाली होती. दुपारी तीनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला होता. राजेश एक उत्तम अभिनेते होते. त्यांच्या जाण्याचे चित्रपटसृष्टीचे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया त्यांचे मित्र विष्णू शर्मा यांनी दिली आहे. त्यांचे मूळ नाटकांमध्ये होते. अनेक नाटकांतील त्यांच्या भूमिका गाजलेल्या होत्या. महाभारत आणि भारत एक खोज सारख्या घराघरात पोहोचलेल्या मालिकांतही त्यांनी काम केले होते.
बातम्या आणखी आहेत...