आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने दिला वडिलांना अखेरचा निरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडिलांच्या अंत्य यात्रेत पोहोचलेला नवाजुद्दीन सिद्दीकी. - Divya Marathi
वडिलांच्या अंत्य यात्रेत पोहोचलेला नवाजुद्दीन सिद्दीकी.

नवी दिल्ली : 'बजरंगी भाईजान' सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात आलेला सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वडिलांच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. हृदयविकाराच्या धक्क्यामुळे नवाझचे वडील नवाबुद्दीन यांचे निधन झाले. ते 76 वर्षांचे होते. पॅरालिसिसमुळे गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. त्यांना सहारनपुर येथील तारावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच सोमवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी त्यांच्या बुढाना या गावात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमध्ये येथे ते वास्तव्याला होते.
सर्वात मोठा मुलगा आहे नवाजुद्दीन
मुळचे बुढानाचा रहिवाशी असलेला नवाजुद्दीन सिद्दीकी नवाबुद्दीन यांचा सर्वात मोठा मुलगा आहे. त्याला एकुण सात भावंड आहेत. एनएसडीमधून डिग्री प्राप्त केल्यानंतर नवाजने बॉलिवूडमध्ये 'शूल', 'सरफरोश' आणि 'मुन्नाभाई एमबीबीएस' या सिनेमांमध्ये छोटेखानी भूमिका वठवून आपल्या करिअरची सुरुवात केली. काहीच महिन्यांपूर्वी नवाजुद्दीन दुसऱ्यांदा पिता झाला. सलमानसोबत नवाझुद्दीनचा 'बजरंगी भाईजान' बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत असून त्याच्या भूमिकेचंही कौतुक होत आहे. यापूर्वी नवाझचे 'ब्लॅक फ्रायडे', 'पिपली लाईव्ह', 'तलाश', 'कहानी'सारखे अनेक सिनेमे गाजले आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा नवाजुद्दीनच्या वडिलांच्या अंत्य यात्रेची छायाचित्रे...