आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day: लतादीदींच्या वडिलांची झाली होती दोन लग्ने, दुस-या पत्नीच्या मुली आहेत लता-आशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाऊ हृदयनाथ मंगेशकर, बहीण मीना, आशा आणि उषा मंगेशकर यांच्यासोबत लता मंगेशकर (उजवीकडे), त्यांच्या मागे भींतीवर वडील दीनानाथ आणि आई सेवंतीबेन मंगेशकर यांच्या प्रतिमा - Divya Marathi
भाऊ हृदयनाथ मंगेशकर, बहीण मीना, आशा आणि उषा मंगेशकर यांच्यासोबत लता मंगेशकर (उजवीकडे), त्यांच्या मागे भींतीवर वडील दीनानाथ आणि आई सेवंतीबेन मंगेशकर यांच्या प्रतिमा
एन्टरटेन्मेंट डेस्कः लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर यांची दोन लग्ने झाली होती. दोन सख्ख्या गुजराती भगिनींसोबत दीनानाथ यांचे लग्न झाले होते. दीनानाथ मुळचे मराठी होते. त्यांचे पहिले लग्न 1922 मध्ये गुजरातच्या थलनेर (तापी नदीच्या किना-यावर वसलेले) गावातील नर्मदाबेनसोबत झाले होते. नर्मदाबेन यांचे वडील हरीदास त्याकाळातील गुजरातमधील मोठे जमीनदार होते. त्यांना नगरसेठ म्हणून ओळखले जायचे. त्याकाळात गुजराती तरुणीचे मराठी तरुणासोबत लग्न होणे, ही मोठी गोष्ट होती.

लग्नाच्या चार वर्षांनी आजारपणामुळे नर्मदाबेन यांची प्राणज्योत मालवली. त्यांना एकही मुलबाळ नव्हते. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर 1927 मध्ये दीनानाथ यांचे नर्मदाबेन यांची धाकटी बहीण सेवंतीबेनसोबत लग्न झाले. लग्नानंतर सेवंतीबेनचे नाव बदलून सुधामती करण्यात आले. दीनानाथ आणि सुधामती यांना एकुण पाच मुले झाली. यामध्ये चार मुली - लता, मीना, आशा आणि उषा, तर एक मुलगा हृदयनाथ आहेत. लता 13 वर्षांच्या असताना त्यांच्या वडिलांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
लता नव्हे हदया आहे मुळ नाव
लता मंगेशकर यांचा जन्म 28 सप्टेंबर 1929 रोजी इंदोरमध्ये झाला. लता दीदींचे पाळण्यातील नाव हृदया असे असे ठेवण्यात आले होते, मात्र नंतर वडिलांनी ते बदलून लता असे केले. लता हे नाव दीनानाथ मंगेशकर यांनी त्यांच्या 'भवनबंधन' या नाटकातील लतिका या पात्रावरुन प्रेरणा घेऊन ठेवले होते. इतकेच नाही तर हे नाव दीनानाथ यांच्या पहिल्या पत्नी नर्मदाबेन यांच्या नावावरुन ठेवण्यात आल्याचेही म्हटले जाते. नर्मदा यांना त्यांच्या मातोश्री लतिका म्हणून हाक मारायच्या. जेव्हा लता यांचा जन्म झाला, तेव्हा लतिका यांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव लतिका ठेवण्यात आले होते, जे पुढे लता झाले.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, लतादीदींची फॅमिली मेंबर्ससोबतची छायाचित्रे...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...