आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PHOTO: Late Music Composer Aadesh Shrivastava’s Last Selfie For Sonu Nigam

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोनू निगमने शेअर केला आदेश यांचा शेवटचा व्हॉट्सअप मेसेज, जाणून घ्या काय म्हणाले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदेश श्रीवास्तव यांचा शेवटचा सेल्फी आणि त्यांची पोस्ट, उजवीकडे -  सोनू निगम - Divya Marathi
आदेश श्रीवास्तव यांचा शेवटचा सेल्फी आणि त्यांची पोस्ट, उजवीकडे - सोनू निगम
बॉलिवूडचे प्रसिद्ध संगीतकार आदेश श्रीवास्तव यांचे गेल्या शुक्रवारी उशीरा रात्री मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. आदेश श्रीवास्तव यांच्या अकाली निधनामुळे त्यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक असलेला सोनू निगमलासुद्धा मोठा धक्का बसला आहे.
सोनूने आपल्या या लाडक्या मित्राचे स्मरण करत सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकवर त्यांच्या शेवटच्या व्हॉट्सअप मेसेजचे छायाचित्र शेअर केले आहे. रुग्णालयात उपचार घेत असताना आदेश यांनी सोनूला एक मेसेज आणि त्यांचा सेल्फी पाठवला होता.
25 जुलै रोजी झालेल्या गप्पांमध्ये, आदेश सोनूला 'मेरे छोटे भाई...खुश रहो' असे म्हणाले. यावर उत्तर देताना सोनूने आदेश यांच्या प्रकृतीसाठी देवाकडे प्रार्थना केली. तुम्ही लवकर बरे व्हाल, अशी सदिच्छा व्यक्त केली होती.
सोनू निगमने संगीतकार आदेश श्रीवास्तव यांच्याकडे अनेक गाणी गायली आहेत. सोनू आदेश यांच्या जवळच्या मित्रांपैकी एक होता.
पुढे वाचा, आदेश श्रीवास्तव यांचा शेवटचा व्हॉट्सअप मेसेज...