आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'अमर हैं' द्वारे हसन यांचे हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- कमल हसन)

मागील सहा महिन्यांपासून कमल हसन ज्या स्क्रिप्टवर काम करत होते तो चित्रपट 'द अनटचेबल्स' या साहित्य कृतीवर आधारित असल्याचे सांगण्यात येते. महा-मूवी म्हणून ओळखल्या जात असलेल्या या चित्रपटाद्वारे कमल हसन हिंदी चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार, असे दिसते. कमल हसन यांच्या या चित्रपटात देखील राजकारण, अंडरवर्ल्ड, समाज आणि गरिबी दाखवण्यात येईल. चित्रपटात सैफ अली खानची महत्त्वाची भूमिका असल्याचे सांगण्यात येते.
'अमर हैं' शीर्षक असलेल्या या चित्रपटासंबंधी कमल यांनी सांगितले की, सैफ अली खानला लक्षात घेऊनच चित्रपटाची स्क्रिप्ट लिहिण्यात आली होती. चित्रपटामध्ये कमल हसन आणि सैफची भूमिका बरोबरीची असून त्यामध्ये सैफ चांगली व्यक्ती म्हणजे हीरोच्या भूमिकेत दिसेल. अन्य कलाकारांचा देखील चित्रपटात समावेश करण्यात येणार असून त्याची निवड प्रक्रिया चालू आहे. शूटिंग दिल्ली, मुंबई, दुबई, लंडन ,जॉर्डन आणि अमेरिकेतील काही शहरांमध्ये करण्यात येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अद्याप सैफने अधिकृतरीत्या या चित्रपटाला अद्याप होकार कळवला नाही. शिवाय सैफपूर्वी अभिषेक बच्चनला या भूमिकेसाठी संपर्क करण्यात आला होता. स्वत: कमल हसन यांनी या चित्रपटासाठी अभिषेकचे नाव सुचवले होते. मात्र काही कारणांमुळे अभिषेकने हा चित्रपट करण्यास नकार दिला होता.