आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धर्मा बॅनरचा फॉक्स सोबत ५०० कोटींचा करार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः करण जोहर)
फॉक्स स्टार स्टुडिओचे अलीकडे प्रदर्शित झालेले 'खामोशियां', 'मि.एक्स' आणि 'बॉम्बे वेलवेट' हे चित्रपट फ्लॉप ठरले आहेत. त्यामुळे स्टुडिओला मोठे नुकसान सहन करावे लागले. करण जोहरला देखील आपल्या बॅनरद्वारे काही महत्त्वाकांक्षी प्रोजेक्टची निर्मिती करायची आहे. त्यामुळे या दोन स्टुडिओमध्ये जवळपास ५०० कोटींचा करार झाला असल्याचे सांगण्यात येते. या कराराअंतर्गत दोन्ही स्टुडिओ चित्रपटांची निर्मिती आणि वितरण करणार आहे. यामध्ये करण जोहरचे दिग्दर्शन असलेल्या चित्रपटाचा समावेश असणार आहे.
पुढील तीन वर्षांमध्ये या चित्रपटांची निर्मिती करण्यात येईल. या नऊ चित्रपटांच्या दिग्दर्शकाच्या टीममध्ये अयान मुखर्जी, करण मल्होत्रा, अभिषेक वर्मन यांचा समावेश असणार आहे. या चित्रपटामध्ये ऐश्वर्या, रणबीर, आलिया, शाहिद आणि वरुण धवन सारख्या सुपरस्टारचा समावेश असल्याचे सांगण्यात येते.