(फाइल फोटोः करण जोहर आणि ऐश्वर्या राय बच्चन)
'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम' नाकारल्यानंतर अॅशने करण जोहरचा 'ऐ दिल है मुश्किल' स्वीकारला...
करण जोहरने सांगितले की, ऐश्वर्या राय-बच्चनने त्याला फोन करून विनम्रपणे त्याची डेब्यू फिल्म "कुछ कुछ होता है' नाकारली होती. आता १७ वर्षे आणि अनेक प्रस्ताव नाकारल्यानंतर अखेर करणच्या "ऐ दिल है मुश्किल'चा अॅशने स्वीकारला आहे. ती म्हणाली, "करणला फार पूर्वीच होकार दिला असता, पण तारखांची अडचण होती. लग्नानंतर करणशी मैत्री वाढली, आम्ही काही विशिष्ट सायंकाळी सोबत घालवल्या. पूर्वी मी सिनेसृष्टीतील व्यक्तींसोबत सायंकाळचा वेळ घालवत नसे. मी काम संपवा आणि घर जवळ करा, अशा लोकांपैकी होते. परंतु एकेदिवशी सायंकाळी करणने मला "ऐ दिल..'ची कथा ऐकवली. अद्भुतपणे!'
तारखांची अडचण
अॅश सांगते की, "मी सिने जगतात आले तेव्हा एकाच वेळी चित्रपट करत होते. त्यामुळे 'कुछ कुछ होता है'साठी तारखा देऊ शकले नाही. करण नेहमी मस्करी करतो की, इतरांपेक्षा उलट तू फोन करून अतिशय विनम्रपणे नकार दिला होतास. तेव्हा जींसच्या "सात अजूबों वाले..'' गाण्यांच्या चित्रीकरणासाठी जगभर फिरत होते. चिंटूजींसाठी (ऋषी कपूर) अब लौट चलें करत होते'