आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखचा डबल धमाका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
विस्कळीत झालेले नियोजित शूटिंग शेड्यूलमुळे शाहरुखच्या 'फॅन' चित्रपटाच्या रिलीज डेटमध्ये बदल होत तो या वर्षाच्या शेवटपर्यंत प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. निर्मात्यांचा मात्र नोव्हेंबरमध्येच चित्रपट प्रदर्शित करण्याचा विचार आहे. जर निर्मात्यांच्या प्रयत्नांना यश आले तर शाहरुख एका महिन्याच्या आत दोनवेळा पडद्यावर दिसणार आहे. कारण डिसेंबरमध्ये रोहित शेटटीने शाहरुख-काजोल जोडीचा 'दिलवाले' प्रदर्शित करण्याचे निश्चित केले आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, 'फॅन सुरुवातीला बकरी ईद दिवशी प्रदर्शित करण्यात येणार होता. आता शाहरुख, निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक मनीष शर्मा यांनी नोव्हेंबरच्या शेवटी चित्रपट प्रदर्शित करण्याचे निश्चित केले आहे. शाहरुख शूटिंग लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर विजुअल इफेक्टसची टीम यावर काम करुन निर्धारित वेळेत चित्रपटाचे काम पूर्ण करणार आहे. 'फॅन'मध्ये शाहरुख दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.