आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'द अॅव्हेंजर्स-2' विरोधात भारतीय चित्रपटगृहांचे मालक एकवटले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युनिव्हर्सल स्टुडिओने 'फ्युरियस-7' हा हॉलिवूडपट अद्ययावत नसलेल्या चित्रपटगृहामध्ये देखील प्रदर्शित करण्याचे जाहीर करून एक क्रांतिकारी निर्णय घेतला होता. यामुळे 2000 चित्रपटगृहांमधील जवळपास 2500 पडद्यांवर 'फ्युरियस-7' पाहता आला. युनिव्हर्सलच्या या निर्णयामुळे भारतीय चित्रपट व्यवसायामधील मरगळ झटकत चित्रपटाने 100 कोटींचा व्यवसाय केला. मात्र आज (24 एप्रिल) प्रदर्शित झालेला 2015 मधील 'द अॅव्हेंजर्स: ..'हा दुसरा सर्वात मोठा हॉलिवूड चित्रपट केवळ '2 के' तंत्रज्ञान असलेल्या चित्रपटगृहांमध्येच प्रदर्शित होणार आहे.
मार्च 2002 मध्ये डिज्नी, पॅरामाउंट, सोनी युनिव्हर्सल, फॉक्स, वार्नर ब्रदर्स सारख्या हॉलिवूड स्टुडिओने जगभरातील चित्रपटांची प्रिंट प्रक्रिया संपवली. या ठिकाणी आता डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे चित्रपट प्रदर्शित होतात. या स्टुडिओनी '2 के' हे उच्च तंत्रज्ञान नसलेल्या चित्रपटगृहात आपले चित्रपट प्रदर्शित करणे बंद केले. यामुळे चित्रपटगृहांची '2 के' आणि कमी तंत्रज्ञानावर चालणारे 'ई-सिनेमा' अशा दोन गटात विभागणी झाली. 'ई चित्रपटगृहामध्ये' उच्च दर्जाचे तंत्रज्ञान नसताना देखील हिंदी चित्रपट डिजिटल तंत्रज्ञानाने प्रदर्शित होऊ लागले.
'फ्युरियस-7'ने हा ट्रेंड बदलत 'ई चित्रपटगृहामध्ये हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित करुन नवा पायंडा पाडला. मात्र 'द अव्हेंजर्स-2'ने जुनाच कित्ता गिरवत के तंत्रज्ञान नसलेल्या चित्रपटगृहात प्रदर्शित करण्याचा निर्णय घेत 'फ्युरियस-7'वेळी घेतलेल्या निर्णयाला आव्हान दिले.
यामुळे के. सेरा सेरा डिजीटल कंपनीने 'फ्यूरियस-7'चे उदाहरण समोर ठेऊत डिज्नी स्टूडिओच्या विरोधात प्रतिस्पर्धीला आव्हान देण्याची तक्रार दाखल केली आहे. कंपनीच्या या तक्रारीवर मुंबई हायकोर्टने भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाला लवकर निर्णय घेण्याचा आदेश दिला आहे. छोट्या शहराबरोबरच देशभरातील 500 चित्रपटगृह मालकांनी कंपनीने घेतलेल्या निर्णयास समर्थन दिले आहे. या आठवड्यात एकही मोठा चित्रपट प्रदर्शित होणार नसल्याने चित्रपटगृह मालकांना मोठ्या नुकसानाची झळ सहन करावी लागणार आहे. त्यामुळे'द अॅव्हेंजर्स- 2'ने घेतलेल्या निर्णयावर वेगवेगळ्या स्तरातून आक्षेप नोंदवला आहे.
जर के. सेरा सेरा कंपनीच्या बाजूने निकाल लागला तर आगामी काळात हॉलिवूडचे सर्व चित्रपट देशातील छोट्या शहरांमध्ये एकत्र प्रदर्शित होतील. असे झाले तर भारतीय चित्रपट व्यवसायामध्ये मोठे परिवर्तन घडून येईल आणि बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटांसमोर हॉलिवूडच्या चित्रपटांचे आव्हान राहू शकते.