आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही मराठमोळी अॅक्ट्रेस म्हणाली- \'...म्हणून माझ्यासोबत तसले काही नाही झाले\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'वाह ताज'ची अभिनेत्री मंजिरी फडणीस. - Divya Marathi
'वाह ताज'ची अभिनेत्री मंजिरी फडणीस.
आगरा - श्रेयस तळपदेचा 'वाह ताज' हा हिंदी चित्रपट आज रिलिज होत आहे. याचे पोस्टर ऑगस्टमध्ये आगरा येथे लाँच झाले होते. पोस्टर लाँचसाठी चित्रपटाची सगळी टीम आगरा येथे पोहोचली होती. यावेळी अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री मंजिरी फडणीसने धमाल मस्ती केली. येथील रस्त्यांवरुन ट्रॅक्टर चालवण्याचा आनंद त्यांनी घेतला आणि अनेकांसोबत सेल्फी घेतले. त्यानंतर सर्वांच्या आग्रहाखातर चित्रपटातील डायलॉग ऐकवले. चित्रपटाबद्दल काय सांगितले मंजिरी आणि श्रेयसने

वाचा, स्टार्सच्या अफेअरबद्दल काय म्हणाली मंजिरी
- मंजिरीने सांगितले, की ती लहानपणी आगरा येथे आली होती. येथील लोक फार चांगले असल्याचे ती म्हणाली.
- चित्रपट कलाकारांच्या अफेअरबद्दल तिने सांगितले की काही अफेअर्स खरे असतात.
- सोबत राहून-राहून आणि रोमँटिक सीन करताना प्रेम होऊन जाते. मात्र सगळेच अफेअर खरे असतात असे नाही.
- मंजिरीला तिच्या अफेअरबद्दल विचारले तेव्ही ती म्हणाली, मी बहुतेक काम हे विवाहित स्टार्ससोबत केले आहे, त्यामुळे कोणाशी अफेअर झाले नाही.
- 'वाह ताज'टॅक्स फ्री करण्यासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही भेटणार असल्याचे तिने सांगितले.

श्रेयस काय म्हणाला
- श्रेयसने सांगितले, की 2 वर्षांपूर्वी आगऱ्यात ट्रॅक्टर चालवले होते, मात्र आज भीती वाटत आहे.
- त्याने सांगितले, की या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचीही भूमिका आहे. मात्र त्यांचा फक्त आवाज आहे. ते स्टोरी ट्रेलरच्या भूमिकेत आहेत.
- श्रेयसने सांगितले, की आजचे युवक हे डायरेक्शनपासून, प्रोडक्शन आणि इतरही सर्व कामे करत आहेत.

काय आहे 'वाह ताज'
- या चित्रपटाची कथा पूर्ण काल्पनिक आहे.
- ताज महालसमोर एक कुटुंब धरणे आंदोलन करुन सांगते की ताज शहाजहांचा नाही तर आमच्या कुटुंबाचा आहे. त्याचे दस्तऐवज ते दाखवतात.
- या कुटुंबाच्या कारनाम्यामुळे पोलिसही त्रस्त होतात.
- कुटुंबप्रमुख (श्रेयस तळपदे) म्हणतो की ही जमीन आमच्या पूर्वजांची आहे.
- त्यावर कोणी अतिक्रमण केले आणि बिल्डिंग बांधली तर ती त्याची थोडीच होणार आहे.
- त्यानंतर महाराष्ट्रच्या कोर्टातून निर्णय येतो की 23 सप्टेंबर 2016 पासून ताजमहाल बंद करा.
- या चित्रपटाची निर्मिती पेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि स्पायडर वेब कंपनीने केली आहे.

आगऱ्यात झाले होते शुटिंग
- 'वाह ताज'चे शुटिंग फेब्रुवारी 2013 मध्ये आगऱ्यात झाले होते.
- सप्टेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होणार आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मंजिरी - श्रेयसची आगऱ्या रस्त्यावरील धमाल मस्ती...
बातम्या आणखी आहेत...