आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शशी कपूर यांच्यापेक्षा वयाने 21 वर्षे लहान नीतू सिंग होती त्यांची हीरोईन, नंतर झाली सूनबाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दीवारमध्ये शशी कपूर यांच्यासोबत नीतू सिंग)
मुंबईः हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक शशी कपूर यांचा रविवारी दादासाहेब फाळके हा मानाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. सूचना आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी मुंबईतील पृथ्वी थिएटरमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. 18 मार्च 1938 मध्ये जन्मलेल्या शशी कपूर यांनी चार दशकांच्या आपल्या फिल्मी करिअरमध्ये दीडशेहून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
शशी कपूर यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक नायिकांसोबत काम केले. नंदा, राखी, शर्मिला टागोर, शबाना आझमी, झीनत अमान, हेमामालिनी आणि नीतू सिंगसह अनेक अभिनेत्रींसोबत त्यांनी स्क्रिन स्पेस शेअर केली.
Divyamarathi.com आज तुम्हाला शशी कपूर यांच्या ऑन स्क्रिन नायिकांविषयी सांगत आहे.
वयाने 21 वर्षे लहान नीतू सिंगसोबत केले होते शशी कपूर यांनी काम
शशी कपूर यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक नायिकांसोबत काम केले. मात्र या यादीतील नीतू सिंग हे असे एक नाव आहे, जी त्यांच्यापेक्षा वयाने तब्बल 21 वर्षे लहान आहे. नीतू सिंगने शशी कपूर यांच्यासोबत ‘दीवार’, 'काला पानी', 'दूसरा आदमी', 'कभी-कभी' ‘हीरालाल-पन्नालाल’ आणि ‘काला-पत्थर’ यांसारख्या सिनेमांमध्ये काम केले. उल्लेखनीय बाब म्हणजे, ऋषी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर नीतू सिंग त्यांची सून झाली.
पुढील स्लाईड्समध्ये भेटा, शशी कपूर यांच्या अभिनेत्रींना...