मुंबई: बॉलिवूडची हॉट अभिनेत्री लिसा हेडन हिच्याकडे गोड बातमी आहे. लीसाने इन्स्टाग्रामवर एक बिकिनी फोटो पोस्ट करुन ती गर्भवती असल्याचे सांगितले. या फोटोला लीसाने कॅप्शन दिले, “Humble beginnings”.
अडीच महिन्यापूर्वीच झाले होते लग्न...
गेल्यावर्षी 29 ऑक्टोबर रोजी लिसा तिचा बॉयफ्रेंड डिनो ललवानी सोबत लग्नाच्या बंधनात अडकली होती. लिसाने इन्स्टाग्राम वर पोस्ट केलेल्या फोटोला चाहत्यांनी चागंलाच प्रतिसाद दिला आहे. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव देखील करण्यात आला आहे. इन्स्टाग्राम शेअर केलेल्या फोटोत लिसा निळ्या रंगाच्या बिकीनीमध्ये बेबी बंप दाखवताना दिसते आहे.
मुंबईत मॉडेलिंगमध्ये करियर करण्यासाठी येण्यापूर्वी ती ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथे वास्तव्यास होती. मॉडेलिंगनंतर तिने चित्रपटसृष्टीकडे धाव घेतली. डिनो हा पाकिस्तानी वंशाचे ब्रिटीश उद्योजक गुल्लू लालवानी यांचा मुलगा आहे. 2008 साली त्याने बिनॅटोन टेलिकॉम या त्याच्या वडिलांच्या कंपनीचे अध्यक्षपद स्वीकारले. याआधीही लिसाने आपल्या प्रियकरासोबतचे अनेक फोटो सोशल मिडीयावर शेअर केले होते.
या सिनेमांमध्ये झळकली लिसा..
लिसा अलीकडेच आलेल्या 'ऐ दिल है मुश्किल' या सिनेमात झळकली होती. ‘हाऊसफुल्ल 3’, ‘द शौकीन्स’, ‘क्वीन’, ‘रास्कल्स’ आणि ‘आयशा’, 'संता बंता प्राइवेट लिमिटेड' या सिनेमांमध्ये लिसाने काम केले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये बघा, नव-यासोबतचे लिसाचे निवडक PHOTOS...