आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'पद्मावती'तील रणवीरचा लूक रिलीज, चेहरा आणि डोळ्यांतून जाणवते 'खिलजी'चे कौर्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - दीपिका आणि शाहीद कपूर पाठोपाठ 'पद्मावती' सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका असलेल्या रणवीर सिंहचा लूकही रिलीज करण्यात आला आहे. रणवीर या चित्रपटात अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेत दिसणार आहे. क्रूरकर्मा अलाउद्दीन खिलजीच्या भूमिकेसाठी रणवीरने बरीच मेहनत घेतली असून त्याच्या लूकवरूनही ती मेहनत दिसत आहे. 

सुलतान अल्लाउद्दीन खिलजी
रणवीर सिंहचे सुलतान अल्लाउद्दीन खिलजीच्या लूकमधील दोन पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहे. एका पोस्टरमध्ये तो खिलजीच्या संपूर्ण पोषाखात आरशात पाहाताना दिसत आहे. या पोस्टरमध्ये त्याचे डोळे आणि एका गालावर असलेला जखमेचा व्रण यामुळे त्याचा लूक अगदी वेगळा दिसत आहे. तर दुसऱ्या एका पोस्टरमध्ये तो पाण्यात दिसत आहे. 

खिलजीच्या भूमिकेत अडकला रणवीर 
रणवीर सिंहने नुकतेच एका मुलाखतील सांगितले होते की, खिलजीची भूमिका करताना तो या भूमिकेत एवढा खोलवर शिरला होता की त्याच्यावर अनेक दिवस खिलजीचा प्रभाव होता. विशेष म्हणजे या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी रणवीरला मानसोपचार तज्ज्ञाची मदत घ्यावी लागली होती, असेही त्याने सांगितले होते. 

बाजीराव नंतर पुन्हा दीपिका-रणवीर एकत्र
रामलीला आणि बाजीराव मस्तानीनंतर रणवीर सिंह पुन्हा एकदा दीपिका पदुकोनबरोबर काम करत आहे. विशेष म्हणजे संजय लीला भंसाळी यांनीही त्यांच्या सलग तीन चित्रपटांमध्ये ही जोडी घेतली आहे. 

पुढील स्लाइड्सवर पाहा रणवीरचा पद्मावतीतील दुसरा लूक आणि पद्मावतीतील दिपिका आणि शाहीद यांचे Looks.. 
बातम्या आणखी आहेत...