आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lyricist Khayyam Donated 12 Crores For New Artists

संगीतकार खय्यामांकडून १२ कोटींची संपत्ती दान, ९० व्या वाढदिवशी घोषणा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ऐनभरात असताना पैशांच्या राशीत खेळणाऱ्या अनेक कलाकारांवर शेवटच्या दिवसांत मात्र हलाखीत जगण्याची वेळ येते. अाजारावरील उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे नसतात. उपेक्षित तसेच नवाेदित संगीतकार-गायकांच्या मदतीसाठी प्रख्यात संगीतकार खय्याम सरसावले आहेत. आपल्या ९० व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी ‘खय्याम प्रदीप जगजीत’ ट्रस्ट स्थापन केला आहे. त्याला आपली सर्व म्हणजे १२ कोटी रुपयांची संपत्ती दान केल्याचे खय्याम यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

खय्याम म्हणाले, समाजाने मला खूप काही दिले आहे. मला जे मिळाले आहे ते काही प्रमाणात मी समाजाला पुन्हा देऊ इच्छितो. अनेकदा मी पाहतो की काही कलाकार अत्यंत हलाखीचे जीवन जगत असतात. अशा कलाकारांना काही प्रमाणात मदत देता येईल का याचा विचार मी करत होतो. माझी गायिका पत्नी जगजीतही माझ्या या मताशी सहमत झाली आणि आम्ही खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट स्थापन करण्याचे ठरवले. जगजीत कौर म्हणाल्या, हलाखीत जगणाऱ्या कलाकारांना इतर कोणी मदत करायला येत नाही. तेव्हा त्यांना आपण का मदत का करू नये, असे आम्हाला वाटले. त्यामुळेच आम्ही ट्रस्टची स्थापना केली.
या ट्रस्टची संपूर्ण जबाबदारी प्रख्यात गायक तलत अजीज त्यांची पत्नी बीना पाहणार आहेत. तलत यांना खय्याम यांनीच काम करण्याची संधी दिली होती. कलाकारांची निवड करण्यात तलत आणि बीना दांपत्य खय्याम यांना मदत करणार आहेत.

खय्याम यांनी बीबी, फिर सुबह होगी, शोला और शबनम, शगुन, शंकर हुसैन, त्रिशूल, कभी-कभी, उमराव जान, नूरी आदी चित्रपटांना संगीत दिलेले आहे.

दृष्टी देणारा निर्णय
गायकतलत अजीज म्हणाले, समाजाने आम्हा कलाकारांना खूप काही दिले आहे. समाजाप्रती आपण काही देणे लागतो या जाणिवेतून खय्याम साहेबांनी ट्रस्ट स्थापन करण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय आमच्यासारख्यांना दृष्टी देणारा आहे. मला ते वडिलांप्रमाणे असल्याने मी मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.