आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डायरेक्टरने 3rd फ्लोअरवरुन फेकून दिली होती गाण्यांची डायरी, असे बनले हे HIT गीतकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाराणसीः प्रसिद्ध गीतकार समीर इंटरनेटवर त्यांच्याविषयी उपलब्ध असलेल्या चुकीच्या माहितीमुळे चिंतेत आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या वाढदिवसाच्या तारखेपासून ते वडिलांच्या निधनाविषयीच्या अनेक चुकीच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. समीर यांचे वडील अंजान हे प्रसिद्ध गीतकार होते.  समीर यांनी DainikBhaskar.com सोबत त्यांच्या खासगी आयुष्यातील अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. 
 
इंटरनेटमुळे वर्षातून दोनदा लोक येतात सांत्वनाला...
- 660 हून अधिक चित्रपटांमध्ये  4000 हून अधिक गाणी लिहिणा-या समीर यांच्या नावाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आहे.  ते सांगतात, "माझ्या वडिलांचे निधन 3 सप्टेंबर 1997 रोजी झाले होते. पण इंटरनेटवर ही तारीख 3 ऐवजी 13 लिहिण्यात आली आहे.  त्यामुळे लोक वर्षातून दोनदा माझे सांत्वन करतात. त्यामुळे माझे मन आणखी दुःखी होते.  इतकेच नाही तर माझी जन्मतारीखसुद्धा इंटरनेटवर चुकीची नोंदवण्यात आली आहे. त्यामुळे लोक चुकीच्या दिवशी गिफ्ट-कार्ड  पाठवतात आणि घरी भेटण्यासाठी येतात."
 
समीर यांच्याविषयी इंटरनेटवर ही माहिती चुकीची देण्यात आली आहे...
वडील अंजान यांची बर्थ डेट - 28 ऑक्टोबर 1929 आहे. (इंटरनेटवर चुकीचे वर्ष म्हणजे 1930 दाखवते.) 
अंजान यांच्या मृत्यूची तारीख  - 3 सप्टेंबर 1997 (इंटरनेटवर चुकीची म्हणजे 13 सप्टेंबर 1997 ही तारीख दिसते.)
समीर बर्थडे - 24 फेब्रुवारी 1958 (इंटरनेटवर चुकीची म्हणजे 24 एप्रिल दिसते.)

अशी आहे समीरची फॅमिली... 
-समीर यांचे पूर्ण नाव शीतला पांडे आहे. त्यांचा जन्म वाराणसीच्या ओदारे गावात 24 फेब्रुवारी 1958 रोजी झाला. येथेच त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. 
- समीर यांचे वडील लालजी पांडे अंजान हे प्रसिद्ध गीतकार होते. त्यांनी अमिताभ बच्चन स्टारर 'डॉन' या चित्रपटातील 'खाइके पान बनारस वाला' हे गाजलेले गाणे लिहिले होते. याशिवाय 'दिल तो है दिल', 'रोते हुए, आते हैं सब', 'ओ साथी रे', 'प्यार जिंदगी है' (मुकद्दर का सिकंदर), 'लोग कहते हैं मैं शराबी हूं' (शराबी) और 'छूकर मेरे मन को' (याराना) ही गाजलेली गाणी लिहिली होती. 
- समीर यांच्या मातोश्री इंदिरा पांडे या गृहिणी होत्या. आता त्या या जगात नाहीत. 
- समीर यांचे थोरले भाऊ शेखर पांडे आणि वहिनी उषा पांडे या वाराणसीला वास्तव्याला आहेत. 
- समीर यांच्या पत्नी अनीता पांडे या गृहिणी आहेत. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. थोरली मुलगी संचिता पती अभिषेक दुबेसोबत न्यूजर्सी (अमेरिका) येथे वास्तव्याला आहे. 
-  धाकटी मुलगी सुचिता पांडे ही फॅशन डिझायनर असून मुलगा सिद्धेश हायस्कूलमध्ये शिकतोय. 

वडिलांच्या मित्राने तिस-या मजल्यावरुन खाली फेकली होती गाण्यांची डायरी... 
- समीर सांगतात, सुरुवातीच्या काळात मी कवी संमेलन, वृत्तपत्र आणि मॅगझिनसाठी कविता लेखन करत असे. मी या क्षेत्रात येऊ नये, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यांना स्वतःला या क्षेत्रात खूप संघर्ष करावा लागला होता. मी याच संघर्षातून जाऊ नये, असे त्यांना वाटत होते. 
- 1980 साली मी पहिल्यांदा मुंबईत पाऊल ठेवले. पण भीतीपोटी वडिलांकडे न जाता आत्याच्या घरी गेलो. तेथेच राहून कामाचा शोध घेऊ लागतो. त्याकाळी संगीतकार श्याम सागर हे माझ्या वडिलांचे मित्र होते. त्यांनी माझी गाण्यांची डायरी वाचून अतिशय वाईट प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले होते, की वडिलांच्या नावाचा उपयोग करुन गीतकार व्हायला इथे आला. त्यांनी माझी डायरी तिस-या मजल्यावरुन खाली फेकून दिली होती. या घटनेमुळे मी अतिशय निराश झालो होतो. पण याच क्षेत्रात यशस्वी होण्याचा निर्धार मी त्यावेळी केला. 
- वडिलांच्या मित्राने रिजेक्ट केल्यानंतर समीर संगीतकार उषा खन्ना यांना भेटायला पोहोचले. त्यावेळी उषा खन्ना 'बेखबर' या चित्रपटासाठी साँग रेकॉर्डिंग करत होत्या. उषा खन्ना यांनी समीर यांच्याकडून एक गाणे रेकॉर्ड करुन घेतले. या कामासाठी त्यांनी समीर यांना पाच हजार रुपये दिले होते. येथूनच समीर यांच्या करिअरला सुरुवात झाली. 
- समीर पुढे सांगतात, हळूहळू मला या क्षेत्रात यश मिळू लागले. माझे यश बघून श्यामसागर यांनी मला पुन्हा बोलावणे पाठवले आणि माझ्याकडून गाणी लिहून घेतली. मी लिहिलेले पहिले हिट गाणे 'राजा तेरे रस्ते से हट जाऊंगी, गाडी के नीचे आके कट जाउंगी' हे होते. आनंद मिलिंद यांचे संगीत आणि माझ्या लिरिक्सने हे गाणे हिट झाले होते. त्यानंतर एकामागून एक चित्रपट मला मिळत गेले. 'दिल', 'आशिकी' आणि 'साजन' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांसाठी मी गाणी लिहिली. सर्वच गाणी सुपरहिट ठरली.

पुढील स्लाईड्सवर बघा गीतकार समीर यांचे  फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...