आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांत स्टारर 'MS Dhoni'चा टीजर रिलीज, 2 सप्टेंबरला फिल्म होणार रिलीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाहा  'एम एस धोनीः द अलटोल्ड स्टोरी'चा टीजर - Divya Marathi
पाहा 'एम एस धोनीः द अलटोल्ड स्टोरी'चा टीजर
मुंबईः 15 मार्च रोजी नागपुरात भारत आणि न्युझिलंडच्या क्रिकेट सामन्यादरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतने त्याच्या आगामी 'एम एस धोनीः द अलटोल्ड स्टोरी' या सिनेमाचा टीजर लाँच केला. या टीजरमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा खडगपूरच्या रेल्वे स्टेशनपासून एका तिकिट कलेक्टरच्या रुपात सुरु झालेला प्रवास दाखवण्यात आला आहोत. सिनेमात अभिनेता सुशांत राजपूतने धोनीची व्यक्तिरेखा साकारली आहे.
सोशल मीडियावरसुद्धा शेअर केला टीजर...
सोशल मीडियावर सिनेमाचा टीजर शेअर करुन सुशांतने लिहिले, “The journey of @msdhoni now for you to know. Here's the teaser of #MSDhoniTheUntoldStory.”

दिग्दर्शक नीरज पांडेंच्या या सिनेमात अभिनेत्री कियारा आडवाणीने साक्षी धोनीची भूमिका साकारली आहे. सिनेमात अनुपम खेरसुद्धा एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. येत्या 2 सप्टेंबर रोजी सिनेमा बॉक्स ऑफिसवर दाखल होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सिनेमाचे आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...