आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: दिल्लीच्या मॅडम तुसादमध्ये लागणार आशा भोसले यांची वर्णी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सुमधुर आवाजाच्या गायिका आशा भोसले यांचे भारतात अगणित चाहते आहेत. त्यांची ही लोकप्रियता लक्षात घेता आशा भोसले यांच्या मेणाच्या पुतळ्याची दिल्लीतील मॅडम तुसाद म्युझियममध्ये वर्णी लागणार आहे. 2000 साली आशा यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. या पुरस्काराने सन्मानित होणाऱ्या गायिकांपैकी आशा भोसले या प्रथम गायिका आहेत ज्यांचा पुतळा मॅडम तुसादमध्ये मेणबद्ध होणार आहे. 
 
2008 साली गायिका आशा भोसले यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते. विशेष म्हणजे, आशा भोसले या गेल्या 6 दशकांपासून भारतीय चित्रपटसृष्टीत निरंतर कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनूसार, मॅडम तुसाद एक्सपर्टच्या टीमने आशा भोसले यांचे 150 हून अधिक जास्त फोटोज् घेतले आहेत. 
 
83 वर्षीय आशा भोसले यांना या सन्मानाबद्दल विचारले असत्या त्यांनी खूप खूश असल्याचे सांगितले. आशा यांच्याअगोदर श्रेया घोषालचा या जागी पुतळा ठेवण्यात आला आहे. 
 
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीतील या वॅक्स म्युझियममध्ये चित्रपट, खेळ, राजकारण, इतिहास, संगीत यांसारख्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या 50 हून अधिक जणांचा पुतळा ठेवण्यात आला आहे. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, आशा भोसले यांचे माप घेतांना टीमचे काही फोटोज..
बातम्या आणखी आहेत...