आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाभारतातील 'कृष्ण' नितीश राजकारणातही होते सक्रिय, पाहा या मालिकेतील इतर कलाकारांचा आताचा Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः1988 ते 1990 याकाळात टेलिव्हिजनवर प्रसारित झालेल्या महाभारत या मालिकेने लोकप्रियतेचे यशोशिखर गाठले होते. निर्माते बलदेव राज चोप्रा (बी. आर. चोप्रा) यांना सिनेमा आणि टीव्ही इंडस्ट्रीसाठी दिलेल्या अमुल्य योगदानासाठी त्यांना 1995 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 5 नोव्हेंबर 2008 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला.
 
ही मालिका ऑफ एअर होऊन जवळपास 25 वर्षांचा काळ लोटला आहे. मात्र आजही मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत. या 25 वर्षांत मालिकेतील स्टारकास्टच्या लूकमध्ये बराच बदल झालेला दिसून येतो. Divyamarathi.com तुम्हाला महाभारतातील प्रसिद्ध कलाकारांच्या चेह-यात झालेला बदल छायाचित्रांच्या माध्यमातून दाखवत आहे.
 
खरे नावः नितीश भारद्वाज
पात्राचे नावः भगवान श्रीकृष्ण
 
अभिनेते नितीश भारद्वाज यांनी महाभारतात श्रीकृष्णाची भूमिका वठवली होती. 2 जून 1963 मध्ये जन्मलेल्या नितीश यांनी साकारलेली श्रीकृष्णाची भूमिका पडद्यावर अगदी जिवंत केली. लोक त्यांना देव समजू लागले होते. मालिकेमुळे मिळालेल्या लोकप्रियतेनंतर त्यांनी 1996 मध्ये जमशेदपूर लोकसभा निवडणूक लढवली होती. विजयी होऊन ते खासदार बनले होते. नितीश यांनी अनेक मराठी सिनेमांमध्येही अभिनय केला आहे. काही दिवसांपूर्वी ते मराठी डान्स रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसले होते.  
 
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या महाभारतातील इतर कलाकारांविषयी...
बातम्या आणखी आहेत...