आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'महाकाली' च्या अॅक्टर्सपाठोपाठ अपघातात आणखी दोन TV अॅक्टर्सने गमावले प्राण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड टीव्ही अॅक्ट्रेस रचना आणि अॅक्टर जीवन. - Divya Marathi
कन्नड टीव्ही अॅक्ट्रेस रचना आणि अॅक्टर जीवन.
मुंबई/बेंगुलरू - कन्नड टीव्ही अॅक्ट्रेस रचना आणि अॅक्टर जीवन यांनी बुधवारी एका भीषण कार अपघातात प्राण गमावले. रिपोर्ट्सनुसार हे दोघेही अॅक्टर कार्तिकचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी कुक्के सुब्रमण्या मंदिरात जात होते. त्याचवेळी रस्त्यामध्ये मगदीजवळ उभ्या असलेल्या ट्रकला त्यांचा कार जाऊन धडकली. या अपघातात रंजित, एरिक, हॉनेश आणि उत्तम हेदेखिल जखमी झाले आहेत. हे स्थळ बंदाका-बेंगलुरू रोडवर आहे. मगदी पोलिसांनी प्रकरण दाखल केले आहे. 

रचनाने टीव्ही शो 'मधुबाला' मधून करिअर सुरू केले होते. ती कन्नडच्या प्रसिद्ध अॅक्ट्रेसेसपैकी एक होती. तिने 'त्रिवेणी संगम' आणि 'महानदी' अशा मालिकांतही काम केले आहे. महानदीमध्येच जीवननेही काम केले होते. 

महाकालीच्या दोन अॅक्टर्सचा नुकताच झाला होता मृत्यू 
नुकतचे टीव्ही शो 'महाकाली'चे दोन अॅक्टर गगन कांग आणि अरिजित लवानिया यांचाही अशाच अपघातात मृत्यू झाला होता. ते दोघे शुटिंग करुन गुजरातहून मुंबईला परतत होते. 
 
पुढील स्लाइड्सवर, 'महाकाली'चे अॅक्टर गगन आणि अरिजित यांचे PHOTO...
 
बातम्या आणखी आहेत...