आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra CM’S Wife Amruta Makes Her Bollywood Debut!

या आहेत महाराष्ट्राचे CM देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी, बॉलिवूडमध्ये करत आहेत पदार्पण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता गायिका म्हणून आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, कुणाल कोहलीच्या 'फिर से' आणि प्रकाश झांच्या 'जय गंगाजल' या सिनेमांसाठी अमृता यांनी पार्श्वगायन केले आहे.
प्रकाश झांनी केले स्पष्ट
प्रकाश झा यांनी एका मुलाखतीत सांगितले, "मी अमृता यांनी कुणाल कोहलीच्या सिनेमात गायलेले एक गाणे ऐकले. त्यांचा आवाज मला आवडला आणि त्यांना मी 'जय गंगाजल' या सिनेमासाठी विचारणा केली. आम्हाला 'सब धन माटी' या गाण्यासाठी जो आवाज हवा होता, तो आम्हाला मिळाला. सलीम-सुलेमान यांनाही त्यांचा आवाज आवडला. गेल्या महिन्यात आम्ही गाण्याचे रेकॉर्डिंग पूर्ण केले."
काही तासांतच पूर्ण केले रेकॉर्डिंग
प्रकाश झा यांनी सांगितले, "अमृता यांना आपल्या स्टेटसचा गर्व नाही. त्या स्टुडिओत आल्या आणि काही तासांत रेकॉर्डिंग पूर्ण करुन निघून गेल्या. गंगाजल्या टीमसोबत काम करणे हा त्यांच्यासाठी चांगला अनुभव ठरला."
2015 मध्ये मराठी सिनेमासाठी पार्श्वगायन..
2015 मध्ये अमृता यांनी मराठी सिनेमाद्वारे डेब्यू केले होते. साकार राऊतच्या 'संघर्ष यात्रा' या सिनेमाचा टायटल ट्रॅक त्यांनी स्वरबद्ध केला होता. हा सिनेमा गोपिनाथ मुंडेंच्या आयुष्यावर बेतला आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, अमृता यांचे फॅमिली फोटोज...