आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Governor Rejected Sanjay Dutts Appeal

राज्यपालांनी फेटाळली काटजूंची याचिका, संजय पाच वेळा पॅरोलवर आलाय बाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 1993 बॉम्ब स्फोटाप्रकरणी येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असेलल्या अभिनेता संजय दत्तची शिक्षा माफ करावी यासाठी केलेली याचिका राज्यपालांनी फेटाळून लावली आहे. अडीच वर्षांपूर्वी सुप्रीम कोर्टाचे तत्कालीन न्यायाधीश मार्केंडेय काटजूंनी राज्यपालांकडे शिक्षा माफीचा अर्ज केला होता.

राष्ट्रपती, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह, आणि गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंना काटजूंनी पत्रही लिहिलं होतं. परंतु, कोर्टाने संजय दत्तला शिक्षा सुनावल्यामुळे त्याला माफी दिल्यास चुकीचा पायंडा पडेल असा युक्तीवाद करत राज्यपालांनी माफी अर्ज फेटाळला. यापूर्वी त्यांनी गृहमंत्रालयाशीही सल्लामसलत केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

सध्या संजय दत्त 30 दिवसांच्या पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला आहे. आपल्या मुलीच्या नाकाच्या ऑपरेशनसाठी संजय दत्तने जूनमध्ये पॅरोलसाठी अर्ज केला होता. पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी 2 दिवसांपूर्वी संजय दत्तची पॅरोल रजा मंजूर केली.

1993च्या बॉम्बस्फोटावेळी अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्तला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु, खटल्याच्या निकालापूर्वीच त्याने दीड वर्षांचा कारावास भोगला होता. त्यामुळे सध्या तो 3 वर्षांची शिक्षा भोगत असून गेल्या 24 महिन्यांपासून तो पुण्याच्या येरवडा कारागृहात आहे. यापैकी 146 दिवस संजय दत्तने जेलबाहेरच काढले आहेत.

आतापर्यंत 5वेळा पॅरोल बाहेर आला आहे-
संजय दत्तला आतापर्यंत दोन फरलो आणि 1 पॅरोल मिळाला आहे.
आतापर्यंत तुरुंगात 170 दिवस: 16 मे 2013पासून जानेवारी 2014पर्यंत संजय दत्तला जवळपास 240 दिवस तुरुंगात घालवायचे होते. मात्र यादरम्यान तो केवळ 170 दिवसच तुरुंगात राहिला.
सप्टेंबर: संजय दत्तने आपल्या पायाच्या उपचारासाठी सप्टेंबर 2013मध्ये 10 दिवस फरलोचा अर्ज केला होता, परंतु त्याला उपचारासाठी जास्त दिवस लागले होते.
ऑक्टोबर: संजय 1 ऑक्टोबर 2013पासून स्वत:च्या उपचारासाठी दोन आठवड्यांपर्यंत तुरुंगाबाहेर राहिला. त्यानंतर 14 ऑक्टोबरला त्याची सुटी दोन आठवडे वाढवण्यात आली. म्हणजे तो पूर्ण महीना तुरुंगाबाहेर राहिला.
डिसेंबर : डिसेंबर 2013मध्ये संजय दत्त पत्नी मान्यताची तब्येत बिघडल्याने एक महिना पॅरोलवर तुरुंगाबाहेर होता. याला स्वीकार करून त्याला 21 डिसेंबर ते 21 जानेवारीपपर्यंत सुटी देण्यात आली. हे पॅरोल वाढवून 90 दिवस वाढवण्यात आले.
डिसेंबर: 2014 14 दिवस
ऑगस्ट: 2015 30 दिवस (अद्यापही बाहेरच आहे संजय)