आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिषा पटेलची वहिणी बनणार ही Ex बिग बॉस कंटेस्टंट, अश्मितबरोबर केली Engagement

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 'बिग बॉस 5' मध्ये कंटेस्टंट म्हणून सर्वांसमोर आलेली महक चहल अमिषा पटेलची वहिणी बनणार आहे. महकने अमिषाचा छोटा भाऊ अॅक्टर अश्मित पटेलबरोबर साखरपुडा केला आहे. रिपोर्ट्सनुसार महक आणि अश्मित युरोपमध्ये हॉलिडे एन्यॉय करत आहे. त्याचठिकाणी अत्यंत रोमँटिक पद्धतीने अश्मितने तिला रिंग घातली. सहा महिन्यांत त्यांचा साखरपुडा होणार असल्याचे सांगितले जात आहे. 

अश्मितने दिले महकला सरप्राइज 
- एका इंग्रजी वेबसाईटशी बोलताना अश्मितने सांगितले. मी महकला कधीही सांगितले नाही की, मी नेहमी सोबत रिंग घेऊन फिरत असतो. आम्ही नैरावीमध्ये तिच्या कुटुंबीयांना भेटणार होता. मला तिला पॅरिसमध्येच प्रपोज करायचे होते. पण तसे होऊ शकले नाही. मर्बेला (स्पेन) च्या रेस्तरॉमध्येच मी तिला प्रपोज करण्याचा निर्णय घेतला होता. 

असे केले प्रपोज 
- अश्मितने सांगितले, महकला जेवणानंतर डेझर्ट लागते. मी त्यामाध्यमातूनच तिला प्रपोज करायचे ठरवले. पण त्या रात्री तिने काहीही डेझर्ट मागितले नाही. त्यामुळे मी काहीतरी विचार केला आणि वेटरला चॉकलेटमध्ये काही स्ट्रॉबेरी आणायला सांगितले. त्यानंतर मी रिंग स्ट्रॉबेरीबरोबर प्लेटमध्ये ठेवली आणि बाऊलने वर झाकली. 

कोणत्या बोटात रिंग घालायची माहिती नव्हते.. 
- याबाबत बोलताना महक म्हणाली, मला सरप्राइज मिळाले. मी जोरा जोरात हसत होती. रिंग उजव्या हाताच्या बोटात परिधान करतात की डाव्या हेही आम्हाला माहिती नव्हते. त्यामुळे आम्ही थोडावेळ थांबलो. त्यानंतर अश्मित गुडघ्यावर बसला आणि मला प्रपोज केले. त्यावेळी संपूर्ण रेस्तरॉमधील लोक आम्हाला चीअर करत होते. हे सर्व फारच रोमँटिक होते. पॅरेंट्सना भेटून आम्ही लवकरच लग्नाची तारीख ठरवू. 
- लग्नाबाबत अश्मित म्हणाला. सहा महिन्यांत आमचे लग्न होईल असे मला वाटते. मला विदेशात डेस्टीनेशन वेडिंग करायचे आहे. तर महकच्या पॅरेंट्सना भारतात लग्न हवे आहे. त्याबाबत महक म्ङणाली, मी त्याच्याबरोबर आहे. तो माझ्यापेक्षा जास्त मॅच्युअर आहे. त्यामुळे त्याला परिस्थिती जास्त लवकर समजते. 

पुढील स्लाइड्सवर वाचा, 12 वर्षांपासून सोबत आहेत महक आणि अश्मित..
बातम्या आणखी आहेत...