Home »News» Mahesh Babu Birthday Specia Mahesh Babu Namrata Shirodkar Wedding Album

महेशबाबूपेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे पत्नी नम्रता, पाच वर्षे डेटींग केल्यानंतर केले होते लग्न

दिव्य मराठी वेब टीम | Aug 09, 2017, 13:17 PM IST

साऊथ सुपरस्टार महेश बाबू आज त्यांचा 42 वा वाढदिवस साजरा करत आहे. 9 ऑगस्ट 1975 रोजी महेशबाबूचा जन्म चेन्नई येथे झाला. महेशबाबूने वयाच्या 4थ्या वर्षीच चित्रपटात डेब्यू केला होता.1990 पर्यंत काही चित्रपटात काम केल्यानंतर त्याने कॉलेज पूर्ण करण्यासाठी ब्रेक घेतला होता. 1999 साली महेशबाबुने अभिनेता म्हणून 'राजा कुमारुदु' या चित्रपटातून डेब्यू केला. या चित्रपटात त्याची अभिनेत्री प्रिटी झिंटा होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला. यानंतर त्याने अनेक सुपरहिट चित्रपटात काम केले. बॉलिवूड अभिनेत्रीशी थाटले लग्न..
2005 साली महेश बाबूने मिस इंडिया आणि बॉलिवूड अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केले. दोघांची भेट 2000 साली वामसी चित्रपटादरम्यान झाली होती. पाच वर्षे डेटींग केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. दोघांना आता मुलगा गौतम कृष्णा आणि मुलगी सितारा आहे. आज महेशबाबूच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या लग्नाचा अल्बम खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
पुढच्या स्लाईडवर पाहा, महेशबाबू आणि नम्रता शिरोडकरचा Wedding Album...

Next Article

Recommended